Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

24 जून: आजच्या सामन्याचा नाणेफेक कोणी जिंकला ? -भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यासाठी काही वेळातच नाणेफेक होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियामूळे भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

India vs Australia

भारतीय संघाला बदला घेण्याची संधी

जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर ऑस्ट्रेलियन संघ टी-20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीतून बाहेर पडू शकतो. भारतीय संघाचा बदलाही पूर्ण होईल. भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर पडू शकतो

भारतीय संघ अ गटात चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे.. या विजयासह भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. जर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि अफगाणिस्तानने शेवटचा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

ट्रॅव्हिस हेड होऊ शकतो धोका

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 फॉर्मेटमधील शेवटचा सामना 3 डिसेंबर 2023 रोजी झाला होता. भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला होता. ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारतीय संघासाठी धोका ठरू शकतो. अशा स्थितीत नव्या चेंडूसह जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सलामीच्या षटकातच ट्रॅव्हिस हेडला बाद करण्याचा प्रयत्न करतील

येथे पाहू शकता मोफत सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना तुम्ही येथे विनामूल्य पाहू शकता. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर हा सामना मोफत पाहू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+