कोण आहे यशस्वी जयस्वालची कथित प्रेयसी ? आता फोटो होतोय व्हायरल
Yashasvi Jaiswal Affair : टीम इंडियाचा सलामीवीर आणि राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपला संघ सोडून दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, जयस्वालने वेगळा मार्ग स्वीकारला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वाल मुंबई संघाकडून खेळतो. आता त्यांनी एनओसी मागितली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तो गोवा संघाकडून खेळण्यास पात्र होणार आहे.
यशस्वी जयस्वालच्या या निर्णयाने एमसीएलाही आश्चर्य वाटले पण त्यांनी त्याची मागणी मान्य करून त्यांना मुक्त केले आहे. त्यानंतर यशस्वी आता 2025-26 हंगामात गोव्याकडून खेळेल. काही लोकांनी सोशल मीडियावर लिहिले की कदाचित पैशांमुळेच यशस्वीने त्याचा देशांतर्गत संघ सोडला आहे आणि इतका मोठा निर्णय घेतला आहे.

'हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता'
दरम्यान यशस्वी जयस्वाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता, हा एक भावनिक क्षण आहे, आज मी जे काही आहे ते मुंबईमुळे आहे, पण गोव्याने मला नेतृत्वाची भूमिका दिली आहे म्हणून आता मी गोव्याच्या संघासाठी खेळेन.' माझे संपूर्ण लक्ष राष्ट्रीय संघावर आहे, जेव्हा मी टीम इंडियामध्ये नसेन तेव्हा मी गोवा संघाकडून खेळेन.
'यशस्वी' परदेशी मुलीच्या प्रेमात ?
23 वर्षीय यशस्वीने खूप कमी वेळात टीम इंडियामध्ये स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. 2019 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत द्विशतक झळकावणारा यशस्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप लोकप्रिय आहे, यामागील कारण म्हणजे यशस्वीची 'रुमर्ड गर्लफ्रेंड' म्हणून ओळखली जाणारी परदेशी सुंदरी मॅडी हॅमिल्टन.
यशस्वी ती पोस्ट पुन्हा चर्चेत
खरंतर 2022 मध्ये यशस्वीने त्यांच्या इंस्टा अकाउंटवर मॅडी हॅमिल्टनचा फोटो करत तिला आपलं'कुटुंब' असं म्हटले होते. मॅडी हॅमिल्टनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये यशस्वीचा फोटोही पोस्ट केला होता, तेव्हापासून या दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
जरी दोघांनी आपल्या नात्याची कबूली दिली नसली तरी जेव्हा मॅडी भारतात तेव्हा ती सामन्यांदरम्यान यशस्वी जयस्वालला चीअर करताना दिसते. मॅडी इंग्लंडची आहे आणि ती खूप सुंदर आहे.
यशस्वी जैस्वालची क्रिकेट कारकिर्द
- यशस्वीने जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
- पहिल्याच सामन्यात यशस्वीने 171 धावांची शानदार खेळी केली.
- 2024 मध्ये यशस्वीने इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावली.
- सर डॉन ब्रॅडमन आणि विनोद कांबळी यांच्यानंतर कसोटी इतिहासात सलग दोन द्विशतके झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू आहे.
- 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सने यशस्वीला 2.40 कोटी रुपयांना खरेदी केले.
- 2024 मध्ये यशस्वीने एका वर्षात 34 षटकार मारून ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडला.
- 2024 मध्ये यशस्वी 22 वर्षांच्या आधी 1000 कसोटी धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.












Click it and Unblock the Notifications