आधी धोनी, हॉकी अन् आता चेसमध्ये डी गुकेशला चॅम्पियन बनवणारा कोण आहे विदेशी मेंटार, वाचा स्टोरी

D Gukesh and Paddy Upton : जागतिक बुद्धिबळाचा राजा बनला तो भारताचा डी गुकेश. अतिशय कमी वयात हा मान पटकावणारा तो ठरला. डी गुकेश काय एका दिवसात चॅम्पियन बनला नाही. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. परंतु, या विजयानंतर मानसिकदृष्ट्या खेळाडूंना मजबूत करणाऱ्या एका प्रशिक्षकाचे नाव आता समोर आले आहे. ती व्यक्ती आहे पॅडी अप्टन. भारत जेव्हा जेव्हा विविध खेळांमध्ये चॅम्पियन ठरला तेव्हा पॅडी अप्टन यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

डोम्माराजू गुकेश (डी गुकेश) चेस वर्ल्ड चॅम्पियन बनण्यात दक्षिण आफ्रिकेच्या पॅडी अप्टन यांचे मोठे योगदान असल्याची चर्चा रंगली आहे. हा तोच अप्टन आहे, जो एक प्रसिद्ध मानसिक आणि कंडिशनिंग प्रशिक्षक आहे. याआधीही त्याने 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासोबत काम केले आहे. 2024 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघासोबत तो होता.

D Gukesh-Paddy Upton Story

पॅडीने सांगितले की गुकेशने या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप आधी स्वतःला कसे तयार केले. एका व्हिडिओमध्ये गुकेशने स्वत: या चॅम्पियनशिपसाठी कशी तयारी केली, पॅडीने त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कसे तयार केले हे सांगितले. तो मानसिकदृष्ट्या कसा मजबूत झाला. हे डी गुकेशने सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जी गुकेशसोबत पॅडी होता. गुकेशने नुकत्याच जारी केलेल्या व्हिडिओ म्हटले होते की, फायनलच्या तयारी कशी केली आहे. पॅडीसोबत काम करणे खूप आनंददायी होते. 18 वर्षीय गुकेश सध्याचा विश्वविजेता डिंग लिरेनचा पराभव करून इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे.

इंडियन एक्स्प्रेस यांच्याशी संवाद साधताना अप्टन डी गुकेशबद्दल म्हणाला - त्याने संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे स्वत:ला हाताळले त्याचा अभिमान वाटतो. वयाच्या 18 व्या वर्षी त्याने आपल्या पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विलक्षण परिपक्वता दाखवली. तो प्रत्येक चालीत परिपूर्ण खेळेल किंवा प्रत्येक खेळात परिपूर्ण खेळेल किंवा 14 खेळांसाठी परिपूर्ण स्पर्धा खेळेल असे आम्हाला कधीच वाटले नाही. हे करणे शक्य नाही. परंतु, गुकेशने ते करून दाखवले आहे.

डी गुकेशने इतिहास रचला

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन 2024 चा अंतिम सामना गुरुवारी (12 डिसेंबर) सिंगापूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताच्या डी गुकेशची गतविजेत्या चीनी बुद्धिबळ मास्टर डिंग लिरेनशी स्पर्धा होती. काळ्या तुकड्यांसह खेळताना डी गुकेशने 14व्या गेममध्ये डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. आपला विजय अगदी जवळ आला आहे आणि तो नवा चॅम्पियन बनणार आहे, असे जेव्हा गुकेशला वाटले तेव्हा तो भावूक झाला. यानंतर तो भावुक झाला आणि रडू लागला. त्याचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. जाहिरात

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+