IPL 2025 : राजस्थानकडून IPLमध्ये पदार्पण करणारा कुणाल सिंग राठोड कोण आहे? जाणून घ्या त्याची कारकिर्द
Who is Kunal Singh Rathore : IPL 2025 मध्ये 4 मे (रविवारी) रोजी ईडन गार्डन्स येथे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL)राजस्थान रॉयल्सतर्फे कुणाल सिंग राठोडने पदार्पण केले आहे. वैभव सूर्यवंशीसारख्याच अपेक्षा या उमद्या खेळाडूकडून आहे.
आयपीएलच्या 2023 च्या हंगामात कुणालचा समावेश झाला होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती, आज मात्र कोलकाता नाईट रायडरविरुद्ध त्याला आपला खेळ दाखवण्याची संधी त्याला प्राप्त झाली आहे.

आयपीएलमध्ये 30 लाखांत लिलाव
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 30 लाख रुपयांना खरेदी झालेल्या कुणालला या वर्षाच्या सुरुवातीला डीवाय पाटील टी-20 कपमध्येही स्थान मिळाले होते. त्याने तीन डावांमध्ये 54.5 च्या सरासरीने आणि 209.6 च्या स्ट्राईक रेटने 109 धावा फटकावल्या.
आठव्या वर्षीपासून क्रिकेटचा श्रीगणेशा..
कोटा येथील कुणालने वयाच्या 8 व्या वर्षी आपला क्रिकेट प्रवास सुरू केला आणि 17 वर्षांखालील खेळाडू म्हणून नागपूर येथील राजस्थान रॉयल्स अकादमीच्या शिबिरातही भाग घेतला.
- यष्टीरक्षक असलेला कुणाल राठोड हा राजस्थानकडून खेळणारा क्रिकेटपटू आहे.
- यष्टीरक्षक आणि तो डावखुरा फलंदाज आहे.
- त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिला हंगाम सामान्य राहिला.
- कुणाल राठोडने 2022 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत 36.75 च्या सरासरीने आणि 128.94 च्या स्ट्राईक रेटने 147 धावा केल्या.
- मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि इतर दोन्ही फॉरमॅटमध्येही त्याने आपल्या राज्यासाठी चांगली कामगिरी केली आहे.
- आयपीएल 2023 च्या आधी कुणालने राजस्थान रॉयल्स संघात स्थान मिळवले.
- संजू सॅमसन, जोस बटलर आणि ध्रुव जुरेल सारख्या अनुभवी खेळाडूंचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.
कुणाल राठोडच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर
- भारताच्या प्रमुख देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत तो सहभागी झालेला आहे.
- विजय हजारे ट्रॉफी 2023-24 मध्ये, राठोडने 41.66 च्या सरासरीने 250 धावा केल्या आहेत.
- सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, त्याने 35.66 च्या सरासरीने 107 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट मागील वर्षीच्या 128.(4 वरून चालू वर्षी 152.85 वर पोहोचला.












Click it and Unblock the Notifications