26 चेंडूत शतक, सामन्यात ठोकले 24 सिक्सर, 6 चेंडूत 6 षटकार! 'हा' खेळाडू ख्रिस गेलपेक्षाही निघाला भारी
Who is zain Naqvi hit century in 26 balls 24 sixes in match : 23 वर्षीय इटालियन फलंदाज जैन नक्वीने क्रिकेटच्या इतिहासात कधी कुणी केले नसेल ती किमया करुन दाखवली आहे. याला चाहते चमत्कारही म्हणू शकतात असा खेळ या खेळाडून केला आहे. या खेळाडूने T-10 सामन्यात अवघ्या 26 चेंडूत शतक आणि शेवटच्या षटकात 6 चेंडूत 6 षटकार ठोकला. त्याच्या खेळीने जगभरातील क्रिकेट चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत.
सर्वात आधी भारतीय माजी फलंदाज रवी शास्त्री यांनी 6 चेंडूत 6 षटकार ठोकत विक्रम केला होता. त्यानंतर भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगने ही किमया साधली. तुम्ही ख्रिस गेलचे नाव घेतले की, त्याची धुंवाधार बॅटींग आणि उत्तुंग षटकार कोण विसरणार..पण झैनी नक्वी हा खेळाडू तर यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे गेला.

जैन नक्वी याने युवराजसिंह सारखे एकाच षटकात त्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकलेच पण त्याही पेक्षा म्हणजे अवघ्या 10 षटकांच्या सामन्यात त्याने सात आठ नव्हे तर तब्बल 24 षटकार ठोकले. ख्रिस गेलला षटकाराचा राजा म्हटले जाते पण त्यानेही एकाच सामन्यात एवढे षटकार ठोकले नसतील एवढे नक्वीने ठोकले आहेत आणि अवघ्या 26 चेंडूत 100 धावा पुर्ण केल्या आहेत.
एकीकडे आयपीएलचा सीजन भारतात सुरु आहे आतापर्यंत क्रिकेटच्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज शाहीद आफ्रिदीने 37 चेंडूत शतक झळकावले आहे, आयपीएल आणि टी 20 सामन्यात 30 चेंडूत शतक करण्याचा विक्रम आहे पण यापेक्षा कमी चेंडू म्हणजे 26 चेंडूत 23 वर्षीय जैन नक्वीने शतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. त्याच्याकडे क्रिकेटचा नवा तारा म्हणून पाहिले जात आहे.
अशी केली जैन नक्वी याने खेळी..
- युरोपियन टी-10 मध्ये टीम सिव्हिडेट आणि मारखोर मिलानो यांच्यात झालेल्या सामन्यात जैनच्या बॅटने चांगली कामगिरी केली.
- मारखोरतर्फे बॅटींग करुन स्फोटक फलंदाजी करत जैनने शेवटच्या षटकात सलग 6 चेंडूंवर 6 षटकार ठोकले. त्याने 26 चेंडूत शतक पूर्ण करून इतिहास रचला.
- शतक पूर्ण केल्यानंतरही त्याने गोलंदाजांविरुद्ध जोरदार फलंदाजी केली. त्याने 37 चेंडूत 160 धावांची शानदार खेळी केली.
- या खेळीत त्याने 24 षटकार आणि 2 चौकार लगावले. या काळात त्याने 432.43 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
- जैन नक्वी इटली संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व केले आहे.
जैन नक्वीच्या संघाने जिंकला सामना
हा सामना मारखोर मिलानो संघाने जिंकला. मारखोर मिलानो संघाने प्रथम फलंदाजी करत 2 गडी गमावून 210 धावा केल्या. 211 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना सिव्हिडेटचा संघ 9 षटकांत 106 धावांत सर्वबाद झाला.












Click it and Unblock the Notifications