Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वडील ट्रक चालक तर मुलानं इंग्लंडमध्ये घातला धुमाकूळ; 52 चेंडूत शतक अन् टीम इंडियाला दिला विजय!

who is Harvansh Singh Pangalia : भारताचा अंडर-19 संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. बहु-फॉर्मेट दौऱ्यापूर्वी, या टीममधील भारताच्या युवा फलंदाजाने खळबळ उडवली अन् इंग्लिश संघाला दिवसाच आकाशातील तारे दाखवले.

या खेळाडूने वादळी शैलीत फलंदाजी करून इंग्लिश गोलंदाजांच्या नाकात दम आणला. तो खेळाडू कोण आहे, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय संघाचा अंडर -19 मधील फलंदाज हरवंश पंगालिया, ज्याने क्रीजवर येताच सामन्याचा मार्गच बदलला आणि वेगवान शैलीत फलंदाजी करून शतकी खेळी केली. त्याच्या शतकाने भारतीय संघाने टूर मॅच जिंकली आणि धमाकेदार शुभारंभ केला.

Harvansh Singh Pangalia

राहुल कुमार, कनिष्क चौहान आणि अम्ब्रीश यांच्या बॅटमधून अर्धशतके आली, त्यानंतर हरवंश सिंग पंगालियाने वादळी शैलीत फलंदाजी करून धुमाकूळ घातला. त्याने 9 षटकार आणि 8 चौकार ठोकले आणि 52 चेंडूत शतक झळकावले. तो 103 धावा काढून नाबाद परतला आणि भारताचा धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यात 449 धावांवर नेला.

प्रत्युत्तरात खेळताना, यंग लायन्स संघ धावसंख्येचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला आणि एकूण 211 धावांवर बाद झाला. भारतीय संघाने सामना 231 धावांनी जिंकला. या विजयात हरवंशने महत्त्वाची भूमिका बजावली.

कोण आहे हरवंश सिंग पंगालिया

हरवंश सिंग पंगालिया हा एक यष्टिरक्षक-फलंदाज आहे आणि त्याने घरगुती क्रिकेटमध्ये त्याच्या चमकदार कामगिरीने आधीच प्रसिद्धी मिळवली आहे. तो सौराष्ट्राच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 117 धावांची धमाकेदार खेळी केली.

हरवंश हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम शहरातील रहिवासी आहे. त्याचे कुटुंब सध्या कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात स्थायिक आहे, जिथे त्याचे वडील दमनदीप सिंग ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतात.

युवराज सिंगचा चाहता आहे हरवंश सिंग पंगालिया!

हरवंश हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार युवराज सिंगचा खूप मोठा चाहता आहे आणि स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध त्याने मारलेल्या सहा षटकारांच्या खेळी त्याला सर्वात जास्त प्रेरणा देतात. येणाऱ्या काळात त्याच्या खेळात आणखी सुधारणा होताना दिसून येईल आणि तो भविष्यात राष्ट्रीय संघात खेळण्यास पात्र खेळाडू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+