Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहे हा 18 वर्षांचा खेळाडू, लिलावात बनला करोडपती, MIने लावली करोडो रुपयांची बोली

IPL 2025 mega auction Day 2: IPL 2025 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अफगाणिस्तानचा युवा खेळाडू अल्लाह गझनफरला 4.80 कोटी रुपयांना विकत घेतले. गझनफर फक्त 18 वर्षांचा असून त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. त्याने यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी नेट बॉलर म्हणूनही बॉलिंग केली आहे. ज्यामुळे त्याची गुणवत्ता आधी संघ आणि मॅनेजमेंटला होती.

आयपीएल मेगा लिलावात अल्लाह गझनफर नाव समोर आल्यानंतर पहिली बोली कोलकाता नाईट रायडर्सने लावली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) देखील या बोलीच्या शर्यतीत सहभाग घेतला. आरसीबीने त्यांची बोली 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवली, तर केकेआरने 4.60 कोटी रुपयांची बोली वाढवली. अखेर मुंबई इंडियन्सने 4.80 कोटींची बोली लावून गझनफरला आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

mumbai indians

कोण आहे गझनफर?

गझनफर त्याच्या फिंगर-स्पिन आणि कॅरम बॉलसाठी प्रसिध्द आहे. अलीकडेच त्याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. आतापर्यंत त्याने 8 एकदिवसीय सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय तो इमर्जिंग आशिया कपमध्ये अफगाणिस्तानच्या विजयी संघाचा एक भाग होता, जिथे त्याने शानदार गोलंदाजी केली. गझनफरने 16 टी-20 सामन्यात 5.71 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीने 29 विकेट घेतल्या आहेत.

मुंबईने या खेळाडूंना कायम ठेवले

आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत रिटेन केले होते. याशिवाय त्याने हार्दिक पंड्या (16.35 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी) आणि तिलक वर्मा (8 कोटी) यांनाही आपल्या संघात कायम ठेवले आहे. आयपीएल 2025 मध्येही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+