Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इंग्लडविरुद्ध एका डावात 6, कसोटीत 10 बळी घेणारा आकाशदीप कोण आहे? क्रिकेट खेळायला वडीलांचा होता विरोध

Who is Akashdeep : एजबॅस्टन कसोटीत मोठा विजय मिळवून भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कर्णधार शुभमन गिलने दोन्ही डावांमध्ये मोठी शतके झळकावून इंग्लंडच्या गोलंदाजांची झोप उडवली. तर याच सामन्यात आकाश दीपनेही आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून देत दुसऱ्या डावात सहा बळी टीपले.

सहा बळीमुळे पाचव्या दिवशी भारताच्या विजयात आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली. या कसोटी सामन्यात १० बळी घेणाऱ्या आकाशदीपची सध्या चर्चा आहे. आपण आज भारताला विजय मिळवून देण्यात कर्णधार गिलइतकीच महत्वाची भूमिका साकारणाऱ्या आकाशदीपबद्दल जाणून घेऊया.

Who is Akashdeep

Take a Poll

कोण आहेत आकाशदीप?

  • आकाश दीप हा भारतीय क्रिकेटपटू असून वेगवान गोलंदाज आहे.
  • आकाशदीपचा जन्म १५ डिसेंबर १९९६ रोजी झाला असून तो मूळचा बिहारचा आहे.
  • 28 वर्षीय आकाशदीपचे मुळ गाव सासाराम (रोहतास-बिहार) हे असून त्याला सासाराम एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाते.
  • आकाशदीपने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले.
  • २३ फेब्रुवारी २०२४ रोजी रांची येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या सत्रात त्याने ३ टॉप ऑर्डर फलंदाजांना बाद करून खळबळ उडवून दिली होती.
  • आकाशदीप इतर बिहारी खेळाडूंप्रमाणे, दुसऱ्या राज्यातून देशांतर्गत क्रिकेट खेळून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यात यश मिळवले.
  • आकाशदीप उजव्या हाताने फलंदाजी करतो तर उजव्या हातानेच जलद-मध्यम गोलंदाजी करतो.

कोणत्या संघाकडून खेळला आकाशदीप

आकाशदीप बंगाल आणि शेष भारत संघाकडून तो खेळलेला आहे.आयपीएलमध्ये तो आधी लखनऊ सुपरजायंट्स आणि नंतर राॅयल चॅलेंजर बंगळुरू संघाकडून खेळला आहे.

आकाशदीपच्या या न ऐकलेल्या काही महत्वाच्या गोष्टी

  • इएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आकाशदीपला विश्वासाने चेंडू दिला की, तो सलामीसह मध्यमफळी मोडून काढतो.
  • आकाशदीपला क्रिकेट खेळण्यास त्याच्या वडीलांचा विरोध होता.
  • नोकरीच्या शोधात तो काकाच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये आला आणि स्थानिक क्रिकेट अकादमीत सहभागी झाला.
  • आकाशदीप वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होऊ लागला, परंतु आकाशला दोन महिन्यांत त्याचे वडील आणि मोठा भाऊ गेल्याने कुटुंबावर दुःखाचा सामना करावा लागला. यामुळे त्याला तीन वर्षांसाठी खेळ सोडावा लागला.
  • आकाशने हार मानली नाही आणि तो कोलकाता येथे गेला जिथे त्याने CAB च्या दुसऱ्या विभागीय लीगमध्ये युनायटेड क्लबकडून सुरुवात केली. शहरात तो मोहम्मद शमीलाही भेटला आणि त्याच्या तंदुरुस्तीवर टीप्स दिल्यानंतर मध्यात वेगाने लांब स्पेल गोलंदाजी करण्यास त्याने सुरुवात केली.
  • २०१९ मध्ये, तो बंगाल अंडर-२३ संघात स्थान मिळवला आणि त्याच वर्षी त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये बंगालसाठी वरिष्ठ पदार्पण केले. त्याच्या दुसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात, आकाशने गुजरातविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या, अशा प्रकारे त्याने हंगामात १८.०२ च्या सरासरीने ३५ विकेट्ससह बंगालसाठी रणजी फायनलमध्ये प्रवेश केला.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+