Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs ENG: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड T20 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या ? अव्वल यादीत 2 भारतीय खेळाड

IND vs ENG: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारी पासून 5 सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 22 जानेवारीला पहिल्या टी20 सामन्याने होणार आहे. T20 क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. यावेळीही तसे होणे अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाचा पराभव टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली. आता घरच्या मैदानावर टीम इंडियासाठी मोठं टास्क असणार आहे. खासकरुन भारतीय फलंदाजांवर नजर असणार आहे. टी-20 मध्ये भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. येथे आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील अश्या पाच खेळाडूंबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांनी जास्त धावा केल्या आहेत.

IND vs ENG

विराट कोहली : या यादीत भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू विराट कोहलीचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20 विश्वचषकात विजय नोंदवल्यानंतर त्याने सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा केला आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध एकूण 21 सामने खेळताना 648 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 अर्धशतकाचा समावेश आहे.

जोस बटलर : या यादीत दुस-या क्रमांकवर आहे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर. इंग्लिश संघाच्या कर्णधाराने भारताविरुद्धच्या T20 क्रिकेटमध्ये एकूण 22 सामन्यांमध्ये 498 धावा केल्या आहेत. या 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

रोहित शर्मा : यादीतील तिसरा क्रमांक एका रोहीत शर्माचा लागतो. T20 विश्वचषक चषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने T20 च्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्माने इंग्लंड संघाविरुद्धच्या 16 सामन्यात 467 धावा केल्या होत्या. त्याने एक शतक आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत.

जेसन रॉय : या विशेष यादीत इंग्लंडच्या जेसन रॉयनेही आपले नाव नोंदवले आहे. जेसन रॉयने एकूण 15 सामने खेळले असून 356 धावांचे योगदान दिले. त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकलं आहे.

इऑन मॉर्गन : इंग्लंडचा माजी कर्णधार मॉर्गन पाचव्या स्थानावर आहे. मॉर्गनने भारतीय संघाविरुद्ध एकूण 16 सामने खेळले असून 347 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतकं झळकली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+