Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू आता कुठे आहेत? यावेळीही 3 खेळाडू खेळणार

ICC Champions Trophy: भारतीय संघाने 11 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. टीम इंडियाने त्यावेळी यजमान इंग्लंडला हरवून जेतेपद पटकावले होते. पावसामुळे 50 षटकांचा अंतिम सामना टी-20 मध्ये बदलला.

टीम इंडियाने 2020 षटकांचा सामना अगदी जवळच्या फरकाने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडने 8 विकेट गमावत 124 धावा केल्या आणि टीम इंडियाने विजेतेपद पटकावलं.

Champions Trophy 2013

त्या सामन्यात खेळलेल्या प्लेइंग इलेव्हनमधील असे तीन खेळाडू यावेळीही संघात खेळताना दिसणार आहेत. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचे खेळाडू आता कुठे आहेत आणि काय करत आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

महेंद्रसिंग धोनी: धोनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधार होता. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आयपीएलमध्ये सक्रिय आहे.

रोहित शर्मा : सध्या रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. त्या फायनलमध्ये त्याच्या बॅटमधून 9 धावा आल्या. रोहित शर्मा यावेळीही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे.

विराट कोहली: कोहली अजूनही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. त्या फायनलमध्ये 43 धावा करण्यात यशस्वी ठरलेला कोहली यावेळीही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.

रवींद्र जडेजा: त्या फायनलमध्ये जडेजाची बॅट खेळली. 25 चेंडूत 33 धावा करणारा जडेजा यावेळीही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे.

शिखर धवन : 2013 मध्ये 31 धावा करणारा धवन आता निवृत्त झाला आहे. आयपीएल आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धवन त्याच्या आयुष्याचा आनंद घेत आहे. एका चित्रपटात त्याचा कॅमिओ आला होता. तो नेपाळ प्रीमियर लीगमध्येही खेळताना दिसला होता.

दिनेश कार्तिक: चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 च्या फायनलमध्ये कार्तिकने फक्त 6 धावा केल्या होत्या, आता तो निवृत्त झाला आहे आणि कॉमेंट्री करताना दिसत आहे.

सुरेश रैना: रैना काही वेटरन क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसला. 2020 मध्ये ते निवृत्त झाला. रैना कॉमेंट्री करतानाही दिसून येतो आहे.

रविचंद्रन अश्विन: त्या फायनलमध्ये 15 धावांत 2 बळी घेणारा अश्विन आता निवृत्त झाला आहे. तो युट्युबवरील त्याच्या चॅनेलद्वारे खेळांचे विश्लेषण करतो.

भुवनेश्वर कुमार : टीम इंडियातून बाहेर असलेला भुवी निवृत्त झालेला नाही, तो आयपीएलमध्ये खेळतो.

इशांत शर्मा : इशांत शर्माही आयपीएलमध्ये खेळताना दिसला आहे. तो संघाबाहेर असला तरी निवृत्त झालेला नाही.

उमेश यादव: उमेश यादव देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय दिसला आहे, संघाबाहेर आहे पण निवृत्ती घेतलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+