Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PM XI: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ बदलली? पुढील सामना कधी, कुठे पाहता येईल ते जाणून घ्या

IND vs AUS: ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ गुलाबी चेंडूने पंतप्रधान इलेव्हनशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे 30 नोव्हेंबरपासून दोन दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे.

मार्च 2022 मध्ये बेंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा दिवस-रात्र सामना खेळलेल्या भारतासाठी हा सराव अत्यंत आवश्यक असेल. भारताचा सामना पंतप्रधान इलेव्हनशी होणार आहे. ज्यात काही अनुभवी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू तसेच काही नवीन प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे.

ind vs aus pm xi

संध्याकाळाच्या वेळी गुलाबी चेंडू खेळणे खूप आव्हानात्मक असते. सराव सामन्याला प्रथम श्रेणी सामन्याचा दर्जा नसल्याने भारतीय फलंदाजांना सराव करणे आवश्यक असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द पर्थ कसोटी 295 धावांनी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडलेला कर्णधार रोहित शर्मा संघात परतला आहे. तसेच अंगठ्याच्या फ्रॅक्चरमधून बरा झालेला शुभमन गिल देखील संघात परतला आहे, त्यामुळे संघाच्या फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता आहे. पहिली कसोटी 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

भारत विरुद्ध पंतप्रधान इलेव्हन सराव सामना कुठे पाहायचा?

भारत विरुद्ध पंतप्रधान इलेव्हन सराव सामना हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:10 वाजता स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे हा सराव सामना होणार आहे.

भारत विरुद्ध पंतप्रधान इलेव्हन संघ: जॅक एडवर्ड्स (कर्णधार), चार्ली अँडरसन, महाली बियर्डमन, स्कॉट बोलँड, जॅक क्लेटन, एडन ओ'कॉनर, ऑली डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर, हॅनो जेकब्स, सॅम कोन्स्टास, लॉयड पोप, मॅथ्यू रेनशॉ, जेम रायन.

भारतीय संघ: केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, सरफराज खान कृष्णा, रवींद्र जडेजा, अभिमन्यू ईश्वरन

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+