द्रविड 'एवढ्या' कोटींचा मालक,भारतीय प्रशिक्षकाकडं गाडी, बंगला आणि बरंच काही...
Rahul Dravid Net Worth : भारतीय क्रिकेट संघात कर्णधाराकडे जशा जबाबदाऱ्या असतात त्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या या मुख्य प्रशिक्षकाकडे असतात. कर्णधाराच्या भूमिकेपेक्षा प्रशिक्षकाची भूमिकाही महत्त्वाची असते. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या जबाबदारीची कारकीर्द सध्या संपलीय.

आपल्या कौशल्याने आणि अनुभवाने त्याने भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकप जिंकून दिलाय. मुख्य प्रशिक्षकाला मिळणारा मोठा पगार संघासाठी त्याचे महत्त्व दर्शवतो. या बातमीतून आज आपण राहुल द्रविडच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकू.
ICC T20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. BCCI 51 वर्षीय द्रविडला प्रशिक्षक म्हणून वार्षिक 10 कोटी रुपये मानधन देत होती. जगातील कोणत्याही क्रिकेट प्रशिक्षकाला मिळणारे हे सर्वाधिक वेतन आहे.
किती आहे द्रविडची संपत्ती?
स्पोर्ट्सकीडाच्या अहवालानुसार, द्रविडची अंदाजे एकूण संपत्ती 320 कोटी रुपये आहे. क्रिकेट व्यतिरिक्त द्रविड जाहिरातीच्या माध्यमातूनही उत्पन्न कमवतो. कॅस्ट्रॉल, मॅक्स लाइफ, रिबॉक आणि जिलेट सारख्या ब्रँडच्या जाहिराती राहुल द्रविड करतो. त्या माध्यमातूनही तो प्रचंड पैसा कमावतो.
कार, आलिशान घर आणि...
रिपोर्ट्सनुसार, द्रविडकडे कोरमंगला, बेंगळुरू येथे 4.2 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. याशिवाय जर आपण त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोललो तर द्रविडकडे BMW 5 सीरीज, मर्सिडीज बेंझ, Lamborghini आणि Audi Q5 लक्झरी SUV सारख्या कार आहेत.
असं होतं राहुलचं करिअर
राहुल द्रविड भारताकडून 164 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याची सरासरी 52.31 होती. द्रविडने एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.16 च्या सरासरीने 10,889 धावा केल्या आहेत. त्याच्या 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, द्रविडने भारतीय संघासाठी 164 कसोटी सामने खेळत 13,288 धावा केल्या आहेत. याशिवाय 344 एकदिवसीय सामने आणि 1 टी-20 सामनाही राहुल खेळला आहे.












Click it and Unblock the Notifications