एका रात्रीत किंग कोहलीपेक्षा श्रीमंत झाला अजय जडेजा, वाचा नेमकं काय घडलं, एकूण संपत्ती किती?
Ajay Jadeja Networth : भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण दसऱ्याच्या दिवशी गुजरातच्या जामनगर येथील जाम साहेब शत्रुशल्यसिंहजी जडेजा यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे गुजरातच्या जामनगर राजघराण्याचे पुढचे 'जाम साहेब' हे अजय जडेजा हे असणार आहेत.
जामनगरचा पुढील वारसदार बनल्यानंतर आता अजय जडेजा हे किती व कोणत्या संपत्तीचे मालक बनले आहेत, याची चर्चा रंगली आहे. विशेष बाब म्हणजे अजय जडेजा यांची संपत्ती आता भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीपेक्षा देखील जास्त झाली आहे. तर एका रात्रीत झालेल्या निर्णयामुळे अजय जडेजा आता विराटपेक्षाही किती तरी पटीने श्रीमंत बनला आहे.

अजय जडेजा किंग कोहलीपेक्षा झाला श्रीमंत
वनइंडियाच्या रिपोर्टनुसार विराट कोहलीची सध्याची संपत्ती 1000 कोटी रुपये आहे. जामनगरचा उत्तराधिकारी घोषित झाल्यानंतर अजय जडेजाची एकूण संपत्ती 1455 कोटींच्या पुढे गेली आहे. जडेजाकडे एवढी संपत्ती आली कुठून? उत्तर म्हणजे त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता. अजय जडेजा केएस रणजितसिंहजी आणि केएस दुलीपसिंहजी यांच्या वंशातील आहेत. त्यामुळे त्यांची संपत्ती आता किती तरी पटीने असणार आहे.
आयपीएलमधूनही जडेजाची कमाई
अजय जडेजा देखील आयपीएलमध्ये त्याच्या कॉमेंट्रीमधून पैसे कमावतो. ज्यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळते. रिपोर्टनुसार, तो आयपीएलच्या एका हंगामात कॉमेंट्रीमधून सुमारे 2 ते 3 कोटी रुपयेपेक्षा जास्त रक्कम कमावतो आहे.
अजय जडेजाची क्रिकेट कारकिर्द कशी
अजय जडेजाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर तो भारतीय संघासाठी एकूण 15 कसोटी आणि 196 एकदिवसीय सामने खेळला आहे. या कालावधीत त्याच्या धुवाधार बॅटमधून कसोटीच्या 24 डावांत 26.18 च्या सरासरीने 576 धावा केलेल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 179 डावांमध्ये 37.47 च्या सरासरीने 5359 धावा काढल्या. जडेजाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 34 अर्धशतकांचे देखील रेकॉर्ड आहे.












Click it and Unblock the Notifications