वेस्ट इंडिजने भारत दौऱ्यासाठी संघ जाहीर केला, दोन्ही संघ पुढील महिन्यात 3 टी-20, 3 वनडे खेळणार
West Indies India Tour: वेस्ट इंडिजची वूमन्स टीम पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहे. वेस्ट इंडिज .वि. भारत या मालिकेत 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला आहे.
वेस्ट इंडिज त्यांच्या सर्वात अनुभवी खेळाडूशिवाय भारत दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिजची स्टार खेळाडू स्टेफनी टेयर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशा स्थितीत विंडीज संघाला तिच्याशिवाय भारत दौऱ्यावर जावे लागणार आहे.

संघाचे नेतृत्व हेली मॅथ्यूजकडे असेल. माजी कर्णधार डायंड्रा डॉटिन वनडे संघात पुनरागमन करत आहे. टी-20 विश्वचषकात तिने आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 9 षटकार मारले होते. त्यानंतर तिने 2022 मध्ये निवृत्ती जाहीर केली. पण पुन्हा एकदा तो दोन वर्षांनी संघात पुनरागमन करत आहे.
वेस्ट इंडिजच्या संघात आलिया ॲलेने, शमिलिया कॉनेल, नेरिसा क्राफ्टन आणि उल्लेखनीय डिआंड्रा डॉटिनसारखे खेळाडू आव्हानासाठी सज्ज आहेत. एफी फ्लेचर, शबिका गझनबी, चेनेल हेन्री आणि जाडा जेम्स, कियाना जोसेफ, मॅंडी मंगरू, अश्मिनी मुनिसेर, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स यासारखे नवीन चेहरे मजबूत लाइनअप पूर्ण करतात.
भारत-वेस्ट इंडिज मालिकेची सुरुवात T20I सामन्यांनी होणार आहे. सर्व सामने मुंबईत होणार आहेत. पहिला T20 सामना 15 डिसेंबरला, त्यानंतर दुसरा 17 डिसेंबरला आणि तिसरा सामना 19 डिसेंबरला होणार आहे. यानंतर दोन्ही संघ 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) साठी वडोदरा येथे पोहोचतील. तिन्ही एकदिवसीय सामने फक्त वडोदरात खेळवले जातील. पहिला एकदिवसीय सामना 22 डिसेंबर, दुसरा 24 आणि तिसरा 27 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
हेली मॅथ्यूने आगामी मालिकेसाठी तिची उत्सुकता व्यक्त केली. ती म्हणाली की, "आमच्या संघासाठी जगातील सर्वोत्तम संघांपैकी एकाविरुद्ध गुणवतात दाखवण्याची ही उत्तम संधी आहे. आम्ही आव्हानाची वाट पाहत आहोत आणि काही सकारात्मक परिणामांसह मायदेशी परतण्याची आशा आहे."
वेस्ट इंडिज संघ : हेली मॅथ्यूज (कर्णधार), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, एफी फ्लेचर, शबिका गझनबी, चिनेल हेन्री आणि जैदा जेम्स, कियाना जोसेफ, मॅंडी मांगरू, अश्मिनी मुनिसेर, करिश्मा रामहरक, रशा विल्यम्स.
मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20- 15 डिसेंबर, मुंबई
दुसरा T20- 17 डिसेंबर, मुंबई
तिसरा T20- 19 डिसेंबर मुंबई
पहिली वनडे- 22 डिसेंबर, वडोदरा
दुसरी वनडे- 24 डिसेंबर, वडोदरा
तिसरी वनडे- 27 डिसेंबर, वडोदरा












Click it and Unblock the Notifications