‘तुम्हीही गप्प बसा!' काॅमेट्रीवेळी वीरेंद्र सेहवाग, सिद्धू यांच्यात वाद! काय झालं नेमकं? घ्या जाणून
Virender Sehwag and Sidhu have an argument during commentary : भारताचा माजी धुरंधर आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि माजी स्टार क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धु यांच्यात आयपीएलच्या सामन्यात समालोचनावेळी जोरदार वाद झाला. या वादात गप्प बसा इथपर्यंत येऊन ठेपला...नेमका काय वाद होता., प्रकरण एवढे गरम का झाले...हे आपण या वृत्तात समजून घेऊया.
आयपीएल 2025 मध्ये, 10 एप्रिल 2025 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे सामना खेळला गेला. दिल्लीने हा सामना 6 विकेट राखून जिंकला. यासह दिल्लीने या मोसमातील एकही पराभव न पत्करता चौथा विजय संपादन केला.

या सामन्यादरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू, आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग कॉमेंट्री करत होते. यादरम्यान सेहवाग आणि सिद्धूमध्ये वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची चर्चाही जोरदार रंगत आहे.
काय आहे वाद आणि व्हिडिओ?
स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, यामध्ये वीरेंद्र सेहवाग कॉमेंट्री करताना दिसतो. तो आकाश चोप्राला सांगत की, मी पॉवरप्लेमध्ये 50 धावा होतील असा अंदाज वर्तवला होता पण त्या पन्नास धावा फक्त तीन ओव्हरमध्येच झाल्या. यादरम्यान नवज्योत सिद्धू बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तेव्हा सेहवागने गंमतीने त्यांना गप्प बसण्यास सांगितले. "तु्म्ही 70 धावा होतील असे म्हटले होते,आता तुम्ही गप्प बसा" असे म्हटले. यावर सिद्धू म्हणाले की, तुम्हीही गप्प बसा. यानंतर तिन्ही समालोचक हसताना व्हिडिओत दिसतात.
जशी बॅटींग होती तसेच समालोचन
विरेंद्र सेहवाग जशी बॅटींग करायचा तसेच आपल्या काॅमेट्रीतून तो शाब्दीक फटकारे लगावतो. अत्यंत उत्साहवर्धक आणि रोमहर्षक काॅमेट्री नवज्योतसिंग सिद्धू हेही करतात दोघेही उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी ओळखले जातात, मॅचच्या समालोचनादरम्यान दोघेही एकमेकांशी चर्चा हास्यविनोद करतात आणि एकमेकांची टरही उडवतात.
विरेंद्र सेहवागची क्रिकेट कारकिर्द
वीरेंद्र सेहवाग याचा जन्म 20 ऑक्टोबर 1978 रोजी झाला. तो एक माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. 1999 ते 2013 या काळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तो सर्वात विध्वंसक सलामीवीरांपैकी एक म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या काळातील महान फलंदाजांपैकी तो एक होता. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रतिनिधित्व केले.
विरेंद्र सेहवागचे पदार्पण, रेकाॅर्ड
- 1999 मध्ये पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळात पदार्फण आणि 2001 मध्ये भारतीय कसोटी संघात विरेंद्र सेहवाग सामील झाला.
- एप्रिल 2009 मध्ये, सेहवाग 2008 मध्ये त्याच्या कामगिरीसाठी जगातील विस्डेन लीडिंग क्रिकेटपटू म्हणून सन्मानित होणारा पहिला भारतीय बनला.
- 2009 त्यांनी भारताचा कर्णधार बनला. भारतासोबतच्या कार्यकाळात, सेहवाग 2002 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, 2007 T20 विश्वचषक आणि 2011 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघांचा सदस्य होता.
- 2002 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, सेहवागने सर्वाधिक 271 धावा केल्या होत्या. 2023 मध्ये, त्याला आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले.
- सेहवागच्या नावावर अनेक विक्रम आहेत, ज्यात कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 सर्वाधिक धावा केल्या होत्या, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद त्रिशतक (फक्त 278 चेंडूत 300 धावा) होत्या.
- कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा 300 धावांचा टप्पा पार करणाऱ्या जगातील चार फलंदाजांपैकी सेहवाग एक आहे.
- किमान 3000 कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सेहवागचा कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक स्ट्राइक रेट आहे.
- विरेंद्र सेहवागचा कसोटी सामन्यातील स्ट्राइक रेट 82.23 आहे.
- मार्च 2009 मध्ये, सेहवागने 60 चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीयाकडून आतापर्यंतचे सर्वात जलद शतक झळकावले.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका







Click it and Unblock the Notifications