Virat Kohli's record : विराटने रचला 'हा' विक्रम! कुणी आसपासही नाही; पण कोहली 'या' रेसमध्ये पडला मागे
Virat Kohli's record of most fours in T20 : विराट कोहली आपल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेटमध्ये आपले नाव कमवत आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरीही तो आयपीएल आणि वनडे सामने खेळत राहणार आहे. काल आयपीएलमध्ये विराट कोहलीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम केला. कोहलीने आयपीएलमध्येच नाही तर T-20 मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त चौकाराचा विक्रम केला आहे.
विराट कोहली 23 मे रोजी फलंदाजीला आला तेव्हा त्याने आपल्या जोरदार फलंदाजीला सुरुवात केली. तडाखेबंद चौकार लगावत तो आपली खेळी साजरी करत होता. त्याने 25 चेंडूत 43 धावा ठोकल्या. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला. आरसीबी हैदराबादने दिलेले आव्हान पेलू शकली नाही त्यांचा सर्व संघ 19.5 षटकात बाद झाला.

कोहलीने कोणता विक्रम केला?
विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत परंतु त्याने काल केलेला विक्रम त्याच्या भक्कम फलंदाजीचे दर्शन घडवतो. काल त्याने 800 वा चौकार मारला आणि टी-20 या इतिहासात सर्वात जास्त चौकार मारणाऱ्या खेळाडूच्या यादीत पहिले स्थान निर्विवादपणे राखले. T-20 मध्ये 800 चौकार मारणारा तो एकमेव खेळाडू आहे, त्याच्या आसपासही कुणी फिरकणार नाही असा हा विक्रम आहे.
आयपीएलमध्ये विराटनंतर कुणाचे सर्वात जास्त चौकार?
- चौकार - फलंदाज - संघ
- 800 - विराट कोहली (रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु)
- 694 - जेम्स विंस (हैम्पशायर)
- 563 - एलेक्स हेल्स (नॉटिंघमशायर)
- 550 - रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
- 529 - ल्यूक राइट (ससेक्स)
आयपीलमध्ये कोहली पडला मागे..
शुक्रवारी 24 मे रोजी रात्री लखनऊमध्ये सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) ने 42 धावांनी पराभव केला तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या टॉप दोनमध्ये येण्याच्या संधींना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये विराट कोहलीलाही एक झटका बसला आहे.
विराट कोहलीने हैदराबादविरोधात चांगली खेळी केली. त्याने 25 चेंडूत 43 धावा फटकावल्या पण त्याला आयपीएलमधील बेस्ट पाच फलंदाजात आपले स्थान राखता आले नाही.
शुक्रवारी विराट कोहली जेव्हा खेळायला आला तेव्हा त्याने सहकाऱ्यासोबत केलेल्या 80 धावांच्या त्यांच्या पहिल्या भागीदारीत फिल सॉल्टला मागे टाकले आणि सातव्या षटकाच्या शेवटी 25 चेंडूत 43 धावा केल्या, तरीही तो पहिल्या पाचमध्ये आलेला नाही. त्याने 12 डावात 548 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याच्या फॉर्मकडे पाहता, तो पुन्हा पहिल्या पाचमध्ये परतू शकतो परंतु पहिल्या क्रमांकासाठी अर्थात ऑरेंज कॅपसाठी मोठी रेस आहे.
ऑरेंज कॅपची चूरस
गुजरात टायटन्स (जीटी) चा फलंदाज साई सुदर्शन 638 धावा तर शुभमन गिल 636 धावांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव 583 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मिचेल मार्श हा 560 धावांसह चौथ्या तर यशस्वी जैस्वाल 559 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications