Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी झेप! शाहरुख,आणि अक्षय कुमार टाकले मागे

Virat Kohli Brand Value : भारतीय क्रिकेटर विराट कोहली आता सर्वात महागडा सेलिब्रेटी ब्रँड बनला आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या कामगिरीमुळे खूप चर्चेत आहे. तसेच त्याच्या इतर वैयक्तिक आयुष्याची आणि कामगिरीची देखील चर्चा होत असते. पुन्हा एकदा विराट कोहलीने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Virat Kohli

पण यावेळी विराट कोहलीने कोणत्या क्षेत्रात आपला धबधबा ठेवला आहे हे जाणून घेऊया. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि शाहरुख खान सारख्या बॉलीवूड स्टार्सला मागे टाकत भारतातील सर्वात महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 29% वाढ

या वर्षी विराट कोहलीचे ब्रँड मूल्य जवळपास 29% ने वाढले आहे, जे 227.9 दशलक्षवर पोहोचले आहे, असे एका वृत्तात म्हटले आहे. या प्रभावशाली वाढीमुळे त्याला प्रथम स्थान मिळाले आहे.

या अहवालात सेलिब्रिटींच्या समर्थनातील मनोरंजक ट्रेंड देखील उघड झाले आहेत. टॉप 20 सेलिब्रिटींनी ब्रँड एंडोर्समेंटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे,2022 च्या तुलनेत 14.2% ची वाढ. ही वाढ टेलिव्हिजन आणि डिजिटल जाहिरातींवर वाढलेल्या फोकसमुळे होते.

टॉप ब्रँड व्हॅल्यू असणारे स्टार....

विराट कोहली: 227.9 दशलक्ष ब्रँड व्हॅल्यूसह अव्वल स्थानावर आहे.
रणवीर सिंग: 203.1 दशलक्ष ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या स्थानावर घसरला.
शाहरुख खान: 120.7 दशलक्ष ब्रँड व्हॅल्यूसह तिसरे स्थान.
अक्षय कुमार: 111.7 दशलक्ष ब्रँड व्हॅल्यूसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
आलिया भट्ट: 101.1 दशलक्ष ब्रँड व्हॅल्यूसह पाचव्या स्थानावर कायम आहे. तर
ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रमवारीत असलेल्या इतर नावांमध्ये एमएस धोनी सातव्या क्रमांकावर , सचिन तेंडुलकर आठव्या क्रमांकावर,अमिताभ बच्चन नवव्या क्रमांकावर आणि सलमान खान 10 व्या क्रमांकावर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+