कोहलीसाठी गर्दी जमली, अरुण जेटली स्टेडियमबाहेर पहाटे 3 पासून रांगा, धक्काबुक्कीत चाहते जखमी
Railways Cricket Team vs Delhi Cricket Team: रणजी ट्रॉफी 2024-25 मधील गट टप्प्यातील शेवटच्या सामन्याला आज 30 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाने मोठा धमाका होण्याची अपेक्षा आहे. दिल्ली संघ विरुध्द रेल्वे यांच्यात हा सामना सुरु आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
विराटच्या आगमनाने रणजी ट्रॉफीची क्रेझ एका रात्रीत वाढली आहे. किंग कोहलीला पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये पोहोचले. स्टेडियमबाहेर मोठी गर्दी होती, त्यामुळे काही चाहते जखमी झाले आहेत.

फाईल फोटो सौजन्य- पीटीआय
इंडिया टुडेमधील एका वृत्तानुसार, गेट क्रमांक 16 च्या बाहेर जमावाने एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली, त्यामुळे अनेक चाहते गेटजवळ पडले आणि जखमी झाले. यादरम्यान पोलिसांच्या दुचाकीचेही नुकसान झालं आहे. रिपोर्टनुसार किमान तीन लोक जखमी झाले आहेत. गेटजवळील जखमी चाहत्यांवर डीडीसीए सुरक्षा आणि पोलिसांनी पाया पट्टी बांधून उपचार केले आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना एक सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे.
This is called a crowd puller @imVkohli and this is going to inspire the domestic cricket of India as well. History at #arunjaitleystadium . Hope Indian cricket fans will love and support all domestic cricket just like today pic.twitter.com/QTdrVU6y1b
— Nitin K Srivastav (@Nitin_sachin) January 30, 2025
आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली विराट कोहली खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याने 13 वर्षांपूर्वी रणजीचा शेवटचा सामना खेळला होता. आता एवढ्या दिवसांनी कोहलीचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळ पाहण्यासारखा असणार आहे. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की जर रेल्वे संघ आज बाद झाला नाही तर विराट कोहलीची फलंदाजीला देखील येणार नाही. चाहते त्याला फक्त क्षेत्ररक्षण करताना पाहू शकतील.
The crowd for a Ranji Trophy game in Delhi, anticipating Virat Kohli’s return.
— Akshay Ramesh (@iamnotakshayr) January 30, 2025
“Ranji ka matlab kya hai bhai?’ asks a young fan to his friend. #ranjitrophy pic.twitter.com/xsIkknmkls
विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार
कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीचे फलंदाजीचे स्थान चौथ्या क्रमांकावर असून तो रणजी ट्रॉफीमध्येही त्याच क्रमांकावर खेळणार आहे. कर्णधार आयुष बदोनीने कोहलीच्या फलंदाजीच्या स्थानाबाबतची परिस्थिती आधीच स्पष्ट केली होती. एक दिवस आधी त्याने सांगितले होते की कोहलीचा फलंदाजीचा क्रमांक चारच राहील.
रेल्वे प्लेइंग इलेव्हन: अंशित यादव, विवेक सिंग, सूरज आहुजा (कर्णधार), उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), मोहम्मद सैफ, भार्गव मेराई, कर्ण शर्मा, राहुल शर्मा, हिमांशू सांगवान, अयान चौधरी, कुणाल यादव.
दिल्लीचा संघ: अर्पित राणा, सनत सांगवान, विराट कोहली, यश धुल, आयुष बदोनी (कर्णधार), प्रणव राजूवंशी (यष्टीरक्षक), सुमित माथुर, शिवम शर्मा, नवदीप सैनी, मणी ग्रेव्ह, सिद्धांत शर्मा.












Click it and Unblock the Notifications