Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'रन मशीन' विराट कोहलींवर होतो पैशांचाही वर्षाव! वाचा किती आहे संपत्ती अन् अलिशान कार?

Virat Kohli Net Worth Vehicle Collection : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 'रन मशीन'या नावाने ओळखला जातो. ज्याप्रमाणे तो क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडतो अगदी तसाच त्याच्यावर पैशांचाही वर्षाव होतो. तो खेळात पहिल्या क्रमांकावर आहे, त्याचप्रमाणे आपल्या कष्टाच्या कमाईच्या बाबतीत त्याला कोणतीही स्पर्धा नाही. विराट सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. यामुळेच विराट कोहली संपत्तीच्या बाबतीत अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या पुढे आहे.

अलीकडे अजय जडेजा सर्वात श्रीमंत ठरला, पण तो गुजरातच्या जामनगरचा वारसदार ठरला म्हणून... त्यांच्या संपत्तीची गणना केली जाऊ लागली आहे. पण..आजही विरोट काही कमी नाही. विराट कोहलीची एकूण संपत्ती किती हे आज आपण जाणून घेऊया.

Virat Kohli Net Worth Vehicle Collection

विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये

एका रिपोर्टनुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये आहे. विराट कोहलीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत क्रिकेट आहे. विराट टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. विराटला एका कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये मिळतात. याशिवाय, तो बीसीसीआयच्या वार्षिक करारातून 7 कोटी रुपये कमावतो, तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याचा पगार 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, परंतु याशिवाय, तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो.

एनसीआरमध्ये त्यांची मालमत्ता 100 कोटींवर

विराट कोहली सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे. विराट ब्रँड एंडोर्समेंटसह सोशल मीडिया पोस्टमधून करोडोंची कमाई करतो. विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईतील एका आलिशान घरात राहतो, ज्याची किंमत सुमारे 34 कोटी रुपये आहे. याशिवाय गुरुग्राम, एनसीआरमध्ये त्यांची मालमत्ता 100 कोटी रुपयांहून अधिक मानली जाते. विराट कोहलीने कमाईसोबतच अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे.

या स्टार्टअप्समध्ये मोबाइल गेमिंग, फॅशन वेअर आणि फिनटेक कंपन्यांचा समावेश आहे. विराट कोहली रेस, ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल, डिजिट आणि स्पोर्ट्स कॉन्व्हो सारख्या कंपन्यांशी संबंधित आहे. अशाप्रकारे या स्टार्ट अप कंपन्या विराटच्या उत्पन्नाचाही मोठा स्रोत आहेत.

Virat Kohli Net Worth Vehicle Collection

विराटला महागड्या गाड्यांचा शौक

  • विराट कोहलीकडे एकापेक्षा एक आलिशान कार आहेत.
  • विराटकडे ऑडीपासून बेंटले कॉन्टिनेंटल जीटीपर्यंतच्या आलिशान कार आहेत.
  • बेंटले कॉन्टिनेंटल जीटीची किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.
  • विराटकडे 2.5 कोटी रुपयांची ऑ़डी आर 8 एलएमएक्स ही गाडी आहे.
  • विराट कोहलीने बेंटले फ्लाइंग स्पर देखील खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 3.4 कोटी रुपये इतकी आहे.
  • विराटला लक्झरी एसयूव्ही चालवण्याचाही शौक आहे. विराटकडे रेंज रोव्हर वोग आहे ज्याची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे.
  • विराटचे संपूर्ण कारचे कलेक्शन 30 कोटी रुपयांचे असल्याचे मानले जात आहे.

विराट आयपीएलमध्ये खेळतो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून

विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला झाला. कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात खेळाडूंच्या 2016 च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो आणि 2013 पासून तो संघाचा काही वर्ष कर्णधार होता.

Virat Kohli Net Worth Vehicle Collection

'विराट'ची क्रिकेट कारकीर्द

2008 साली विराट कोहलीने मलेशियामधील 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट 2008 मध्ये, 19 वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले.

ICC क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहीला विराट

2011 क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना 2011 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, 2013 पर्यंत त्याने one day expert हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.

T-20 क्रिकेट विश्वचषक, 2014 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने T-2O क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय T-20 क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर आयसीसी T-20 Worldcup, 20216 मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता.

Virat Kohli Net Worth Vehicle Collection

रन मशीन विराटचे विक्रम

  • 2012 मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती.
  • 2014 मध्ये धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार.
  • सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत.
  • सर्वात जलद शतक, सर्वात जलद 5 हजार धावा आणि सर्वात जलद 10 शतके या विक्रमांचा समावेश.
  • सलग 4 कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान 1000 धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज
  • 2015 मध्ये तो आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.
  • आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम
  • विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हटले जाते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+