Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विराट कोहली टी-२० सामन्यांतील निवृत्ती मागे घेणार? स्वतः बोलून दाखवली मनातील इच्छा, चर्चा वाढल्या

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा व स्टार फलंदाज विराट कोहली यांनी बार्बाडोसमध्ये २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर या फाॅरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र त्यांनी कसोटी व एकदिवसीय सामन्यांत आपली लय कायम ठेवली. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्राॅफीतही या दोन्ही खेळाडूंनी भारताला विजेतेपद मिळवून दिले. आता याच विराट कोहलीने पुन्हा टी-२० स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केलीय.

Virat Kohli s T20 retirement

विराट पुन्हा टी-२० खेळणार

विराट कोहलीने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र तो पुन्हा टी-२० सामने खेळण्याची शक्यता वाढली आहे. ऑलंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारताला ऑलंपिक सुवर्णपदक जिंकण्याची संधी मिळणार आहे. तब्बल १२८ वर्षानंतर ही सुवर्णसंधी मिळणार आहे. टीम इंडियाचा पुरुष व महिला संघ या स्पर्धेत सहभागी होऊन सुवर्णपदक जिंकण्याची तयारी करणार आहे. याच स्पर्धेत विराट कोहली खेळेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत स्वतः विराटनेच चर्चांना सुरुवात केली आहे.

काय म्हणाला विराट?

एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने टी-२० स्पर्धेत पुनरागमन करण्याची इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला, भारत २०२८ मध्ये ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत पोहोचला तर तो फक्त त्या एका सामन्यासाठी निवृत्तीतून बाहेर पडण्याचा विचार करेल. ऑलिंपिक पदक जिंकणे हे खूप मोठे काम असेल." विराटला टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची परवानगी असली तरी, फक्त एका सामन्यासाठी त्याला पुनरागमन करता येणार नाही, असेही बोलले जात आहे.

पुढच्या विश्वचषकात खेळणार

चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ मध्ये विराट भारताचा स्टार परफॉर्मर होता. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातही त्याच्या फॉर्मचे अनुकरण करण्याची त्याला आशा आहे. त्याने ५ सामन्यात २१८ धावा केल्या. विराटने पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८४ धावांची सामना जिंकणारी खेळी केली.
विराटला प्लेअर ऑफ द फायनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+