Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रणवीर इलाहाबादिया प्रकरणी चाहत्यांकडून विराट कोहलीचं कौतूक, युवराज सिंगनेही दिला पाठिंबा

Virat Kohli and Ranveer Allahbadia: युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या इंडियाज गॉट लेटेंट एपिसोडनंतर लोक खूप संतापले आहेत. लोक याप्रकरणी त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहे. याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रणवीरने त्याच्या पालकांच्या लैंगिक संबंधांबद्दल अश्लील कॉमेंट केली होती. त्यामुळे हा मोठ्या वादाचा विषय ठरला आहे

अनेक दिग्गज सेलिब्रिटी इलाहाबादियाच्या यूट्यूब चॅनेलवर येऊन मुलाखती देत ​​असत. त्याच्या चॅनेलवरील पॉडकास्टद्वारे या तरुण मुलाने खूप पैसे कमवले आणि अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. पण त्याच्या एका वाईट कृतीने सर्व काही उद्ध्वस्त केलं आहे. हे प्रकरण अंगाशी आल्यावर रणवीरने माफी मागितली पण त्याचा काही आता उपयोग झाला नाही.

virat kohli and youtuber ranveer allahbadia

अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतलेल्या या युट्यूबरचा आवडता खेळाडू विराट कोहली आहे. विराट कोहलीबद्दल रणवीरने एकदा एएनआयच्या पॉडकास्टवर त्याचा आवडता भारतीय खेळाडू कोण आहे याबाबत खुलासा केला होता. त्यावेळी त्याने कोहलीबद्दल सांगितलं होतं.

विराट कोहलीचं चाहत्यांकडून कौतूक

अलिकडच्या या घटनेमुळे कोहलीने रणवीर इलाहाबादियाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील चाहते कोहलीच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. चाहत्यांनी कोहलीच्या फॉलोइंग लिस्टचे स्क्रीनशॉट दाखवले आहेत, त्याला सर्च केल्यावर असे दिसून येते की, कोहलीने आता रणवीरला अनफॉलो केले आहे.

सिक्सर किंग युवराज सिंगने ही केलं अनफॉलो

त्याचप्रमाणे युवराज सिंगने ही रणवीरला फॉलो करणे थांबवले आहे. रणवीरने शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग, चहल, युवराज सिंग इत्यादी खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्याला त्याच्या पॉडकास्टवर आणखी मोठ्या दिग्गजांना आमंत्रित करायचे होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+