"विनेश की जीत बृजभूषण सिंह के मुंह पर तमाचा" काका महावीर फोगट यांच्या वक्तव्य! असं का म्हणाले? वाचा
नवी दिल्ली - खोटा सिक्का म्हणून हिनवलेल्या गेलेल्या स्टार कुस्तीपटू विनेश फोगट ही ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. विनेशनं मिळवलेला विजय हा बृजभूषण सिंह यांच्या चेहऱ्यावर चपराक आहे असे मोठे वक्तव्य विनेशचे काका आणि गुरू महावीर फोगाट यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.
विनेश फोगट ऑलिम्पिकच्या अंतीम फेरीत पोहचणारी पहिली पहिली भारतीय महिला ठरली आहे. विनेशने आपल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात क्युबाच्या लोपेझ गुझमनचा पराभव करून पॅरिसमध्ये आपले पदक निश्चित केले आहे.

काय म्हणाले विनेशचे काका महावीर फोगट
विनेश फोगटचे काका आणि गुरू महावीर फोगट यांनी सांगितले की, "मुलगी विनेशने बृजभूषण यांच्या तोंडावर चपराक मारली आहे". त्याच वेळी, उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी महावीर फोगट म्हणाले होते की "मला आशा आहे की ती सुवर्णपदक मिळवेल". ते म्हणाले की, विनेशने ज्या जपानी खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी पराभूत केले होते ती आजपर्यंत एकाही सामन्यात हरली नव्हती. महावीर फोगट म्हणाले की, विनेशने मी सांगितल्याप्रमाणे परफॉर्म केले.
बृजभूषण म्हणाले होते विनेश खोटं नाणं
बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगाट हिला खोटं नाणं म्हणून हिनवलं होतं. वास्तविक, ही घटना त्यावेळी घडली जेव्हा 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकनंतर विनेश फोगटवर भारतीय कुस्ती महासंघाने बंदी घातली होती. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी विनेश फोगटला बनावट नाणं म्हटले होते.
विनेश गेली होती नैराश्यात
एका खासगी वाहिनीशी बोलताना बृजभूषण यांनी 'ज्या व्यक्तीने खोटे नाणे काढून आमची नासाडी केली त्याचे नाव विनेश फोगट आहे.'असं म्हटलं होतं. या बंदीनंतर विनेश नैराश्यात गेली पण तिने धीर न सोडता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले.
खोटं नव्हे विनेश आहे खरं नाणं
विनेश फोगटच्या या देदीप्यमान यशाचा आज संपूर्ण देशाला अभिमान आहे. पण, एक वेळ अशी होती जेव्हा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी तिला खोटा सिक्का अर्थात खोटे नाणेही म्हटले होते. पण आज त्याच बनावट म्हणून हिनवणाऱ्या खऱ्या नाण्याने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला हे विशेष
विनेशचा संघर्ष, टीकाकारांना चपराक
विनेश फोगट या तीन ऑलिंपियनपैकी एक होती जिने अनेक तरुण कुस्तीपटूंसह, बृजभूषणसिंह विरुद्ध नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर अनेक महिने चाललेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन चमकदार कामगिरी करून तिच्या टीकाकारांना आणि गैरवर्तन करणाऱ्यांना चपराक दिली.
एक दशकाहून अधिक काळ चाललेल्या तिच्या कारकिर्दीत, विनेशने देशासाठी अनेक पदके आणि पदके जिंकली आहेत, ज्यात 2019 आणि 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, इंचॉनमधील 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक आणि चार वर्षांनंतर जकार्तामधील सुवर्णपदकांसह. विनेशने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले.












Click it and Unblock the Notifications