विनेश फोगाटच्या भावाने रक्षबंधानादिवशी बहिणीला दिली आयुष्यभराची कमाई? व्हिडिओत पहा, नेमके काय घडले
Vinesh Phogat: पॅरिस आॅलिम्पिक 2024 मधून परतल्यावर विनेश फोगाटला खूप प्रेम मिळाले. महिलांच्या 50 किलो कुस्तीच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरल्यानंतरही शनिवारी तिचे नवी दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. ती आपले कुटुंब राहत असलेल्या बलाली येथे जाताना हजारो लोकांनी जागोजाही आंनदोत्सव साजरा केला. विनेशने सोमवारी भावासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
विनेशने भावाला राखी बांधली आणि त्याबदल्यात तिला तिच्या भावाकडून नोटांचे बंडल मिळाले. हे पाहून ती खूप आनंदी दिसली आणि तिने एक वक्तव्यही केले. भावाकडून यावेळी भेट म्हणून सर्वाधिक रक्कम मिळाल्याचा दावा विनेशने केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये विनेशने 500 रुपयांच्या नोटांचे बंडल धरलेले दाखवले आहे. ती गमतीने म्हणते, "माझं वय अंदाजे 30 आहे. गेल्या वर्षी त्याने मला 500 रुपये दिले होते. त्यानंतर आता हे दिले. त्याने ( भावाने) त्याच्या संपूर्ण आयुष्यात एवढेच कमविलेले आहे( गमतीने) जे मला दिले आहे.
विनेश ने बांधी अपने भाई को राखी,
— Dr Monika Singh (@Dr_MonikaSingh_) August 19, 2024
विनेश बोल रही है पहली बार भाई ने इतने पैसे दिए हैं वरना हर साल 10 रुपए देता था ❤️#विनेश_आई_भाजपा_गई pic.twitter.com/1VE11mLMW9
विशेष म्हणजे दिल्लीहून बलालीला जाताना अनेक गावांतील समर्थक आणि खाप पंचायतींनी विनेशचा सत्कार केला होता. अनेक ठिकाणी थांबल्यामुळे 135 किलोमीटरच्या प्रवासाला सुमारे 13 तास लागले. ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर शेकडो लोक दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तिच्या स्वागतासाठी जमले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डाही उपस्थित होते.












Click it and Unblock the Notifications