Vinesh Phogat Net Worth: मर्सिडीज कार, आलिशान घरासह करोंडीची मालकीण आहे विनेश, जाणून घ्या नेट वर्थ
Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशेनंतर भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. विनेशने एकाच दिवसात सलग तीन सामने जिंकून 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.
अंतिम सामन्यापूर्वी विनेशचे वजन केले असता तिचे वजन 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे विनेशचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न तर भंगलेच पण पॅरिस ऑलिम्पिकमधील रँकिंगमधील शेवटच्या स्थानावरील तिचा प्रवासही संपुष्टात आला.

विनेशची भावनिक पोस्ट
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भावूक झालेल्या विनेशने निवृत्ती जाहीर केली. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, आई, आई, कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ करा मला, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व काही संपलंय, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001-2024, मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन, माफ करा."
ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर तिचे काका महावीर फोगट यांनी निराशा व्यक्त केली होती. आपली मुलगी पदक आणणार असल्याचे सांगितले होते. मी स्वत: त्यांना पुढील ऑलिम्पिकसाठी तयार करेन. पण आता हे शक्य दिसत नाही कारण विनेशने निवृत्ती जाहीर केली आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
विनेश फोगट ही ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तिचा कुस्तीतील प्रवास अप्रतिम राहिला आहे. तिला अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्री यांसारख्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
करोंडीची आहे मालकिन
क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या विनेश फोगटच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती अंदाजे 36.5 कोटी रुपये आहे. विनेशच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कुस्ती आहे. याशिवाय ती अनेक उत्पादनांची जाहिरातही करते. तिला क्रीडा मंत्रालयाकडून पगारही मिळतो.
क्रीडा मंत्रालय, रेल्वेकडून पगार मिळतो
विनेश फोगटला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरमहा 50 हजार रुपये पगार मिळतो. याशिवाय विनेश विविध ब्रँड्सच्या जाहिरातीतून भरपूर कमाई करते. इतकंच नाही तर विनेश रेल्वेत काम करते, तिला यासाठी पगारही मिळतो.
आलिशान घर, मर्सिडीज कार
विनेश फोगटचे हरियाणात एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. विनेशकडे टोयोटा इनोव्हा कार देखील आहे, ज्याची किंमत जवळपास 26 लाख रुपये आहे. तिच्याकडे मर्सिडीज जीएलई कारही आहे, ज्याची किंमत 1.8 कोटी रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications