Breaking news : भारतासाठी धक्का! विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र! 50 किलोपेक्षा जास्त वजन भरलं

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिला कुस्तीत 50 किलो गटातून विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचं वजन 50 किलोपेक्षा काही ग्रॅमनं जास्त भरल्याचं वृत्त आहे. हा भारतासाठी आणि विनेश फोगटसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महिला कुस्ती 50 किलो वर्गातून विनेश फोगटला अपात्र ठरवल्याची बातमी भारतीय दलाने खेदाने शेअर केली आहे. रात्रभर संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज सकाळी तिचे वजन काही ग्रॅम 50 किलोपेक्षा जास्त झाले. यावेळी दलाकडून पुढील कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही.

Vinesh Phogat Disqualifies in Paris Olympics Latest Breaking News

विनेशला अंतीम फेरी खेळता येणार नाही

विनेश फोगट अपात्र ठरल्यामुळं आता तिला आज होणारा अंतीम सामना खेळता येणार नाही. याचबरोबर ती आता स्पर्धेतून अपात्र ठरल्यामुळे तिचे ऑलिम्पिक पदकाचं स्वप्नही भंगलं आहे.

उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्युबाच्या कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा 3-2 असा पराभव केला.

दुसरीकडे भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचा जर्मनीकडून 3-2 असा पराभव झाला.

(ही बातमी अपडेट होत आहे..)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+