क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र विकेट! Video पाहून तुमचंही डोकं चक्रावेल, 'असं कसं होऊ शकतं!
CPL 2025 Viral Video : कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्स यांच्यात एक असा सामना झाला, जो क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत.
या सामन्यात गयाना संघाचा फलंदाज शाई होप एका अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला, ज्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा बाद इतका अनोखा होता की समालोचकही हसू आवरू शकले नाहीत.

अनोख्या 'हिट-विकेट'ची कहाणी
सामन्यात शाई होप २८ चेंडूत ३९ धावा काढून चांगल्या फॉर्ममध्ये होता. ट्रिनबागोचा गोलंदाज टेरेन्स हिंड्सने ऑफ स्टंपच्या बाहेर एक चेंडू टाकला. हा चेंडू वाईड होता, पण होपने त्यावर रिव्हर्स रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट मारत असताना त्याचा तोल गेला आणि बॅट स्टंपला लागून बेल्स खाली पडले.
क्रिकेटच्या नियमांनुसार, जर फलंदाज शॉट खेळत असताना किंवा धाव घेताना स्वतःच्या बॅटने किंवा शरीराच्या कोणत्याही भागामुळे स्टंपवर आदळला आणि बेल्स खाली पडल्या तर त्याला 'हिट-विकेट' बाद मानले जाते.
शाई होपसोबतही नेमकं हेच घडलं. गोलंदाजाने टाकलेला चेंडू वाईड असतानाही, नियमांनुसार त्याला बाद घोषित करण्यात आले. हे दृश्य इतकं अनपेक्षित होतं की, चाहत्यांनी सोशल मीडियावर यावर आश्चर्य व्यक्त करत 'तुम्ही हे काय केलंय?' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Unbelievable scenes! 😮
— CPL T20 (@CPL) August 31, 2025
Hit wicket off a wide! 💥#CPL25 #TKRvGAW #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport #Sky365 pic.twitter.com/L89OhDqcuB
सामन्याचा अंतिम निकाल
शाई होपच्या या अनोख्या बादानंतरही गयाना अमेझॉन वॉरियर्सने २० षटकांत ९ बाद १६३ धावा केल्या. संघासाठी रोमारियो शेफर्ड (१९), ड्वेन प्रिटोरियस (२१) आणि क्वेंटिन सॅमसन (२५) यांनी योगदान दिले. ट्रिनबागोच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. अकील हुसेनने ३, तर टेरेन्स हिंड्सने २ बळी घेतले.
१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रिनबागोच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. अॅलेक्स हेल्स (७४) आणि कॉलिन मुनरो (५२) यांनी पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली.
जरी गयानाच्या कर्णधार इम्रान ताहिरने २७ धावांत ४ बळी घेऊन उत्कृष्ट गोलंदाजी केली, तरी तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर ट्रिनबागो नाईट रायडर्सने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.












Click it and Unblock the Notifications