Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वैष्णवी शर्माने विश्वचषकात हॅटट्रिक घेत रचला इतिहास, 5 धावांत 5 बळी घेतले

Women U19 T20 World Cup, Vaishnavi Sharma: भारतीय अंडर-19 महिला संघाची डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयसीसी अंडर- 19 वर्ल्ड कपमध्ये मंगळवार 21 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात या वैष्णवीने हा विक्रम नोंदवला आहे.

अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने त्यांच्या दुसऱ्या गट-टप्प्याच्या सामन्यात यजमान मलेशियाला फक्त 31 धावातचं गुंडाळलं आहे. टीम इंडियाची फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने पदार्पणाच्या सामन्यातच शानदार हॅटट्रिक घेतली आहे. वैष्णवीने तिच्या चार षटकांत पाच धावा देत पाच विकेट्स घेतल्या आहेत. या काळात तिने एक मेडन ओव्हर देखील केली. वैष्णवी शर्माने तिच्या पदार्पणाच्या सामन्यातच ही मोठी कामगिरी केली आहे.

Vaishnavi Sharma

(फोटो सौजन्य : X.com/@BCCIWomen)

19 वर्षीय वैष्णवी शर्माने विश्वचषक पदार्पणातच हॅटट्रिक घेतली

अंडर-19 स्पर्धेच्या इतिहासात हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वैष्णवी दक्षिण आफ्रिकेच्या मॅडिसन लँड्समनसोबत सामील झाली आहे. लँड्समन ही 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात हॅटट्रिक घेणारी पहिली गोलंदाज आहे. 2023 मध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या गट फेरीच्या सामन्यात तिने ही कामगिरी केली आहे.

वैष्णवी शर्माने पाच विकेट्स घेतल्या

नाणेफेक गमावल्यानंतर दुहेरी आकडा गाठणे तर दूरच मलेशियन फलंदाजांपैकी एकही फलंदाज पाच धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. भारताकडून जोशिता व्हीजेने सर्वप्रथम विकेट घेतली. त्यानंतर आयुषी शुक्लाने तिच्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या. मलेशियाने चार विकेट गमावल्यानंतर डावाच्या आठव्या षटकात वैष्णवी शर्माला मैदानात आणण्यात आलं. या फिरकी गोलंदाज असलेल्या वैष्णवीने आपल्या हुशारीने आणि अचूकतेने विरोधी संघाला बॅकफूटवर आणलं.

मलेशियाच्या नावावर लज्जास्पद रेकॉर्ड

वैष्णवीच्या फिरकी गोलंदाजीने मलेशियन खेळाडूंनी गुडघे टेकले. वैष्णवीने डावाच्या 14 व्या षटकात नूर ऐन बिंती रोसलान, नूर इस्मा डानिया आणि सिटी नझवाह यांना सलग चेंडूंवर बाद करत हॅटट्रिक घेतली. मलेशियाने सात षटकांत फक्त नऊ धावांत शेवटचे सहा विकेट गमावले. अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे. मलेशियाने मागील सामन्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे. श्रीलंकेविरुद्ध ऑल आऊट होण्यापूर्वी मलेशियाने फक्त 23 धावा केल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+