IPLमध्ये कमाल, वनडेत धमाल! 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीचा 'हा' विश्वविक्रम! ठरला जगातील पहिला फलंदाज
vaibhav suryavanshi world record : आयपीएलमध्ये दणकेबाज शतक ठोकून सर्व क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेणाऱ्या चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंग्रजांनाही सोडले नाही. तिथे मालिका तर जिंकलीच पण वनडे सामन्यात धमाल त्याने उडवून दिली आहे. त्याने असा विश्वविक्रम केला की पाकिस्तानचा खेळाडूही खूप मागे पडला आता तो जगातील पहिला क्रिकेटर ठरला ज्याने स्ट्राईकरेटमध्ये विश्वविक्रम केला...
वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये स्फोटक खेळी करुन झटपट कमी चेंडूत शतक ठोकले. एकाच डावात नऊ सिक्सर मारण्याचा त्याने पराक्रमही केलेला आहे. वैभव सूर्यवंशीने वाऱ्याच्या वेगासारखी फलंदाजी तर केलीच पण घोड्याच्या दौडीसारख्या धावाही काढल्या. हा आयपीएलचाच खेळाडू नाहीतर वनडेतही आणि परकीय भुमीवरही तिच लय, तिच स्फोटक फलंदाजी कायम आहे हेच त्याने दाखवून दिले आहे. त्याने इंग्लंडमध्येही हाच खेळ दाखवला आहे आणि गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले.

सूर्यवंशीची वादळी खेळी
भारताचा १९ वर्षांखालील संघ आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी गेला होता आणि तेथे मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. या मालिकेच्या विजयात वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली, त्याची वादळी फलंदाजी संघासाठी उपयुक्त ठरली.
वैभव सुर्यवंशीचा विश्वविक्रम
वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर एक असा विक्रम केला आहे, जो आतापर्यंत इतर कोणताही खेळाडू करू शकला नाही, या प्रकरणात सूर्यवंशी जगातील पहिला खेळाडू बनला आहे. त्याने युवा एकदिवसीय मालिकेत सर्वोत्तम स्ट्राइक रेटचा विक्रम नोंदवला आहे. वैभव या यादीत अव्वल आहे पण पाकिस्तानचा एक खेळाडू देखील येथे आहे.
वैभव सूर्यवंशीचा धमाल
वैभव सूर्यवंशीने ५ सामने खेळून धमाकेदार शैलीत फलंदाजी करून एकूण ३५५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक देखील आहे. त्याचा स्ट्राइक रेट १७४ आहे, जो जगात सर्वाधिक आहे. येथे किमान २०० धावा करणाऱ्या फलंदाजांचा उल्लेख केला आहे.
सूर्यवंशीच्या आधी चांगला स्ट्राइक रेट आयर्लंडच्या स्कॉट मॅकबार्थचा होता. ज्याने दोन सामन्यात ९१ धावा केल्या आणि स्ट्राईक रेट १५० होता. वैभव सूर्यवंशीचा १०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. त्याने सर्वांना मागे टाकले आहे.
वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानला मागे टाकले
पाकिस्तानकडून खेळणाऱ्या इम्रान नझीरने १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यात २५६ धावा केल्या होत्या. त्या काळात नझीरचा स्ट्राईक रेट १५९ पेक्षा जास्त होता. आता सूर्यवंशीने नझीरला खूप मागे टाकले आहे आणि आपले नाव अव्वल स्थानावर नोंदवले आहे. त्याच मालिकेत वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही केला. त्याने हा विक्रम फक्त ५२ चेंडूत केला. युवा एकदिवसीय सामन्यात यापेक्षा वेगवान शतक इतर कोणत्याही खेळाडूने केलेले नाही. त्याने ७८ चेंडूत १४३ धावा केल्या.












Click it and Unblock the Notifications