Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वारे पठ्ठ्या! अवघ्या 13व्या वर्षी बनला कोट्याधीश, IPL लिलावातील सर्वात तरुण खेळाडू कोण, वाचा सविस्तर

IPL 2025 Auction : सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयपीएल मेगा लिलावाचा दुसरा दिवस सुरू आहे. आज सर्वात मोठी बोली हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर लावण्यात आली. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. 10 कोटींचा पल्ला पार करणारा भुवनेश्वर आज पहिला खेळाडू ठरला आहे.

IPL च्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू

राजस्थानने 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.

बिहारच्या या खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. बिहारच्या वैभवने वयाच्या 12व्या वर्षी प्रथम श्रेणीत पदार्पण केले. वयाच्या चौथ्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी हे शेतकरी आहेत. वैभव जेव्हा 9 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जवळच्या समस्तीपूर शहरातील क्रिकेट अकादमीत दाखल केले.

IPL 2025 Auction

राजस्थानने 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. वैभव हा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी अंडर-19 कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.

दिल्लीचा फलंदाज प्रियांश आर्यला पंजाबने मूळ किमतीच्या 13 पट म्हणजे 3.80 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. त्याचे हे आयपीएल पदार्पण असेल. प्रियांशने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.

अर्जुन तेंडुलकर अनसोल्ड राहिला

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन विकला गेला नाही. त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने डोनोवन फरेराला 75 लाख रुपयांना विकत घेतले. बंगळुरूने स्वस्तिक चिकाराला 30 लाख रुपयांना विकत घेतले. कोलकाताने अनुकुल रॉयला 40 लाख रुपयांना विकत घेतले. वंश बेदीला चेन्नईने 55 लाख रुपयांना विकत घेतले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+