IPL लिलावाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या तासांत कोण बनला सर्वात महागडा खेळाडू; टॉप-5 प्लेअर्स कोणते?
IPL Auction 2025, Top 5 Players : सौदी अरेबियामधील जेद्दाह येथे रविवारी झालेल्या आयपीएल 2025 लिलावाच्या सुरुवातीच्या फेरीत भारतीय खेळाडूंनी कहर घातला.
लिलावाची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या एका तासांमध्ये भारतीय खेळाडूने जगभरातील मीडियाचे मथळेच फिरवले. कारण, भारतीय खेळांडूंवर लागलेली बोली ही आतापर्यंतची सर्वाधिक बोली होती.
लिलावाची सुरूवात ही अर्शदीप सिंगपासून झाली. त्याला पंजाब किंग्जने त्याचे राईट टू मॅच कार्ड वापरुन 18 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. अर्शदीप नंतर लगेचच, श्रेयस अय्यरने IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनून इतिहास रचला, त्याला पंजाब किंग्जने ₹ 26.75 कोटींमध्ये विकत घेतले. तथापि, हा विक्रम फार काळ टिकला नाही, कारण काही मिनिटांनंतर ऋषभ पंतला लखनौ सुपरजायंट्सने 27 कोटीं रुपयांना विकत घेतले.

टॉप-5 भारतीय खेळाडूंची यादी
- ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींना विकत घेतले.
- श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले.
- अर्शदीप सिंगला पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना विकत घेतले.
- युझवेंद्र चहल, पंजाब किंग्स, रु. 18.
- केएल राहुल, दिल्ली कॅपिटल्स, 14 कोटी रु.
पंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लखनौने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंतच्या आधी पंजाबने अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतले.
लखनौ आणि बंगळुरूने सुरुवातीला पंतसाठी बोली लावली. सनरायझर्स हैदराबादने नंतर 11.75 कोटी रुपयांमध्ये प्रवेश केला, परंतु लखनौने 20.75 कोटी रुपयांची शेवटची बोली लावली. यानंतर दिल्लीने त्यांचे आरटीएम कार्ड वापरले, त्यानंतर लिलावकर्त्याने लखनऊला त्यांची अंतिम बोली मागितली, ज्यावर संघाने सर्वाधिक बोली लावली आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.
कार अपघातानंतर त्याचे IPLमध्ये कमबॅक
2020 मध्ये पंतला दिल्लीने कर्णधार बनवले होते. यानंतर पुढच्याच वर्षी कार अपघातामुळे तो संघाबाहेर होता. 2024 मध्ये पंत पुन्हा दिल्लीच्या कर्णधारपदी परतला. त्याने 13 सामन्यात 446 धावा केल्या ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
शमीला 10 कोटींत हैदराबादने विकत घेतले
दुसऱ्या मार्की लिस्टमधील कॅप्ड खेळाडू मोहम्मद शमीला हैदराबादने 10 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मागील हंगामात भारताचा वेगवान गोलंदाज शमी दुखापतीमुळे खेळला नव्हता. यापूर्वी तो 2023 मध्ये गुजरातकडून खेळला होता. या मोसमात, त्याने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या आणि या स्पर्धेतील पर्पल कॅप धारक देखील होता.
श्रेयस दुसऱ्या स्थानावर गेला पंजाबने 26.75 कोटीत खरेदी केले
इंडियन प्रीमिअर लीग (IPL- 2025) च्या बहुचर्चित मेगा लिलावाला आज सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे सुरूवात झालेली आहे. या ठिकाणी दोन दिवस लिलाव चालणार आहे. दरम्यान, या लिलावाच्या सुरूवातीलाच भारतीय क्रिकेटर श्रेयस अय्यर हा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे.
मार्की यादीतील तिसरा खेळाडू श्रेयस अय्यरला पंजाबने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अय्यरच्या आधी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला कोलकाताने गेल्या मिनी लिलावात 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
दोन दिवस चालणार लिलाव
दोन दिवस चालणाऱ्या या लिलिवात 577 खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील जास्तीत जास्त 204 खेळाडूंवरच बोली लागणार आहे. कारण सर्व संघांमध्ये मिळून 204 खेळाडूंतीच जागा शिल्लक आहे. लिलावापूर्वी 10 संघांनी 46 खेळाडूंना रिटेन केले आहे. आता 204 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 641.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.












Click it and Unblock the Notifications