VIDEO : विमानतळावरच विराट कोहलीचे महिलेसोबत जोरदार भांडण; पहा नेमकं काय घडलं...
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात आहे. गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली. मात्र तेथे पोहोचल्यावर लगेच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली एका नव्या वादात अडकला. तेथील महिला पत्रकारासोबत त्याचा जोरदार वाद झाला. आता हा वाद का सुरु झाला, याचे कारणही गमतीशिर आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील पत्रकारांनी त्यानंतर विराट कोहलीवर टिका करण्याचा धडाकाच लावला. काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात...

टीम इंडिया मेलबर्नला
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात आहे. गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली. मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात 26 डिसेंबरपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. टेस्ट सीरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ कसोटी सामना भारताने जिंकला. एडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ब्रिसबेन टेस्ट मॅच ड्रॉ झाली. चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सध्या मेलबर्नला पोहोचली आहे.
Indian cricket superstar Virat Kohli has been involved in a fiery confrontation at Melbourne Airport. @theodrop has the details. https://t.co/5zYfOfGqUb #AUSvIND #7NEWS pic.twitter.com/uXqGzmMAJi
— 7NEWS Melbourne (@7NewsMelbourne) December 19, 2024
कोहलीचा वाद काय?
विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो महिला पत्रकारासोबत बोलताना दिसतोय. मात्र हे बोलणे साधे- सरळ नाही. त्यात विराट बोलताना खूप रागात दिसतोय. विराट कोहली ऑस्ट्रेलियन पत्रकारांना बोलला की, तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो काढू शकत नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन मीडियाचे म्हणणे आहे की, विराटच्या मुलांचे कुठलेही फोटो त्यांनी काढलेले नाहीत. व्हिडिओही बनवलेले नाहीत.
'या'मुळे विराट भडकला
आम्हाला प्रायव्हसी गरजेची असल्याचे विराटचे म्हणणे होते. या महिला पत्रकार व फोटोग्राफरने त्याच्या कुटुंबाचे व मुलांचे फोटो काढल्याचा कोहलीचा दावा होता. माझ्या परवानगीशिवाय माझ्या कुटुंबाचा कोणीही व्हिडिओ बनवू शकत नाही, असे कोहली त्या पत्रकाराला सांगत होता. या महिला पत्रकाराने फोटो काढल्याचे त्याचे म्हणणे होते. मात्र नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलिया मीडियाने विराट कोहलीला दोष देण्यास सुरुवात केली. विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचे संबंध आधीपासून चांगले नाहीत. याआधीच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सुद्धा त्याचा तिथल्या मीडियासोबत वाद झाला आहे.












Click it and Unblock the Notifications