चॅम्पियन ट्रॅाफीसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा; कुणाला डच्चू? कुणाला संधी? किती वाजता ठरणार?
बीसीसीआय निवड समिती उद्या शनिवारी चॅम्पियन्स ट्राँफी २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा उद्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करणार आहेत.

किती वाजता आहे पीसी?
मीडिया रिपोर्ट्नुसार, बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही पत्रकार परिषदेद्वारे संघ जाहीर करणार आहेत. 18 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. आता निवड समितीने कोणत्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे? यासाठी शनिवारची वाट पाहावी लागणार आहे.
वाढून घेतली मुदत
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर करण्याची 12 जानेवारी ही अंतिम मुदत होती. मात्र जसप्रीत बुमराह याची दुखापत आणि इतर कारणांमुळे निवड समितीने संघ जाहीर करण्याासाठी आयसीसीकडे वाढीव मुदत मागितली होती. त्यानुसार आता 18 जानेवारीला ही निवड होत आहे. ही पत्रकार परिषद मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे.
इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध ज्यांना संधी मिळेल तेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात असतील, असंही म्हटलं जात आहे. आता निवड समिती काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
कोण आहेत संभाव्य खेळाडू?
रोहित शर्मा (कॅप्टन) शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव/अक्षर पटेल/वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.












Click it and Unblock the Notifications