Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवाद्यांची नजर, हल्ल्याचा धोका; 'या' संघटनेने केला प्लेअर्स किडनॅपिंगचा प्लॅन

Champions Trophy 2025 Latest Marathi News : सुमारे तीन दशकानंतर पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान बनला आहे. दहशतवादी हल्ले व विविध दहशतवादी संघटनेच्या वतीने सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे पाकिस्तानात कोणत्याही सामन्यांचे आयोजन केले जात नव्हते. त्यामुळेच की काय भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने भारतीय संघाना पाकिस्तान न पाठविण्याचा निर्णय घेतला. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यावर आता दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली आहे. एका दहशतवाादी संघटनेच्या वतीने तर खेळाडूंचे अपहपण करण्याचा प्लॅन आखला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सामन्यांवर मोठे संकट ओढावले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव आणि दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जात नव्हते. आता जेव्हा 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आले आहे, तेव्हा पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती त्यांना सतावत आहे. पाकिस्तानमध्ये 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ला करण्याच्या ISKP गटाच्या संभाव्य प्रयत्नांबद्दल गुप्तचर संस्थांना माहिती मिळाली आहे.

Champions Trophy 2025

प्रेक्षकांसह खेळाडूंचेही होऊ शकते किडनॅपिंग?

भारतीय यंत्रणांनीही पाकिस्तानला अशा हल्ल्याची शक्यता कळवली आहे. इस्लामिक स्टेट - खोरासान प्रांत (ISKP) चे दहशतवादी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी लोकांचे अपहरण करू शकतात आणि त्या बदल्यात खंडणी मागू शकतात.

ISKP ची नेमकी काय आहे योजना?

पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (ISKP) कडून संभाव्य धोक्याबद्दल इशारा जारी केला आहे, जो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी लोकांचे खंडणीसाठी अपहरण करण्याची योजना आखत आहे. हा दहशतवादी गट विशेषतः चिनी आणि अरब नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले जाते, या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंवार वापरल्या जाणाऱ्या बंदरे, विमानतळ, कार्यालये आणि निवासी क्षेत्रांवर लक्ष ठेवत आहे.

इस्लामिक स्टेट - खोरासान प्रांत

इस्लामिक स्टेट - खोरासान प्रांत (ISKP) ही सलाफी जिहादी गट इस्लामिक स्टेटची एक प्रादेशिक शाखा आहे. जी दक्षिण-मध्य आशियामध्ये, प्रामुख्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय आहे. या दहशतवादी हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही. परंतु, या धोक्याकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+