कांगारूंच्या घरात यशस्वीचा डंका, षटकारांसह शतक, अनेक रेकॉर्ड केले नावावर
Yashasvi Jaiswal: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडिया खूप मजबूत स्थितीत दिसत आहे. पहिल्या डावात गडगडल्यानंतर भारताने केवळ बॉलच नव्हे तर बॅटनेही दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्या डावात टीम इंडिया 150 धावांवर ऑलआऊट झाली होती. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात केवळ 104 धावावरचं गुंडाळलं.
दुसऱ्या डावात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच धुव्वा उडवला. पहिल्या डावात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये गेलेल्या यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात शतक झळकावले. यशस्वी जैस्वालने खास आपल्या स्टाईलने षटकार लगावत शतक पूर्ण केलं

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावून यशस्वीने तो कोणत्या क्षमतेचा फलंदाज आहे हे सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणे हे कोणत्याही फलंदाजासाठी स्वप्नासारखे असतं.
एक आतापर्यंतची आकडेवारी अशी आहे की, पर्थमध्ये शतक झळकावणारा कोणताही भारतीय फलंदाज भविष्यात टीम इंडियाचा महान फलंदाज म्हणून उदयास आला आहे.
दिग्गजांच्या यादीत नाव
या यादीत सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांचा यादी आता यशस्वी जैस्वालचं नाव आघाडीवर आहे. सुनील गावस्कर यांनी 1977 मध्ये पर्थमध्ये, सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये, विराट कोहलीने 2018 मध्ये शतक ठोकले आहे. आता या यादीत यशस्वी जैस्वालही सहभागी झाला आहे.
यशस्वी जैस्वालने तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तो मोठी खेळी खेळण्यासाठी आलो आहे, हे तो बॅटने सिद्ध करत आहे. आपल्या जबरदस्त शैली आणि गुणवत्तेच्या जोरावर यशस्वीने जगभरातील गोलंदाजांना चांगलाच धडा शिकवत आहे. 23 वर्षांचा होण्यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी पाचव्या क्रमांकावर आहे.
सुनील गावसकर 4 शतके, 1971
विनोद कांबळी 4 शतके, 1993
रवी शास्त्री 3 शतके, 1984
सचिन तेंडुलकर 3 शतके, 1992
यशस्वी जैस्वाल 3 शतके,
वयाच्या 23 वर्षापूर्वी सर्वाधिक शतके. यासोबतच यशस्वी जैस्वालही वयाच्या 23 व्या वर्षी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाली आहे. या यादीतही तो पाचव्या क्रमांकावर आहे. 23 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये चार दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकर-8
रवी शास्त्री-5
सुनील गावस्कर- 4
विनोद कांबळी-4
यशस्वी जैस्वाल-4
अनेक रेकॉर्ड केले नावावर
- पहिल्या 15 कसोटी सामन्यात 1500 धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज
- सर्वात जलद 1500 धावा करणारा भारताकडून दुसरा फलंदाज, चेतेश्वर पुजारा पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने 28 डावात 1500 धावा केल्या आहेत.
- ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज
- ऑस्ट्रेलियात शतक करणारा दुसरा सर्वात तरुण फलंदाज












Click it and Unblock the Notifications