भारत वि.दक्षिण आफ्रिका T20 सामना कधी, कुठे खेळवला जाणार,सर्व माहीती एका क्लिकवर
India tour of South Africa 2024 : टीम इंडिया 8 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांच्या टी-20 दौ-यावर जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ 8 नोव्हेंबरला डर्बनमध्ये पहिला सामना खेळणार आहे. या मालिकेत एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे.
दोन्ही संघांमधला टी-20 विक्रम जबरदस्त राहिला आहे. 2006 मध्ये पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर दोन्ही संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने 15 सामने जिंकले तर दक्षिण आफ्रिकेने 11 सामने जिंकले आहेत तर एक सामना निकालाविना संपला. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या नऊ सामन्यांपैकी भारताने तीन सामने जिंकले आहेत, परंतु सहा सामने गमावले आहेत.

या मालिकेदरम्यान रमणदीप सिंग आणि विजयकुमार वैशाक यांना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. रमणदीपने 2024 च्या आयपीएल हंगामात 14 पैकी 5 सामन्यांमध्ये 201.61 च्या स्ट्राइक रेटने अनेक वेळा नाबाद राहून आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो आपला आक्रमक खेळ सुरू ठेवेल, अशी अपेक्षा आहे.
मयंक यादव दुखापतीमुळे बाहेर
विजयकुमार वैशाकने आयपीएलमधील 11 सामन्यात 13 विकेट्स घेऊन आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. त्याने T20 मधील 30 सामन्यांमध्ये 42 विकेट्सचा समावेश आहे. जो भारतासाठी एक उत्तम गोलंदाज म्हणून त्याच्या क्षमतेला दर्शवते. दुसरीकडे मयंक यादव आणि शिवम दुबे दुखापतीमुळे बाहेर आहेत, तर रियान पराग आणि कुलदीप यादवही मालिकेतून बाहेर असतील.
टीम इंडिया
या मालिकेसाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप याचा समावेश आहे. सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान आणि यश दयाल या खेळाडूंचा टीममध्ये समावेश असेल.
दक्षिण आफ्रिका संघ
हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि केशव महाराज हे अनुभवी खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघात परतले आहेत. यासोबतच जेराल्ड कोएत्झी आणि मार्को जेन्सन या नव्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मिहलाली मोंगवाना प्रथमच संघात सामील झाला असून त्यामुळे संघात नवी ऊर्जा आली आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात एडन मार्कराम, ओटनीएल बार्टमन, ट्रिस्टन स्टब्स, गेराल्ड कोएत्झी, डोनावन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जेन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिली माँगवेन, रिकॅबन पीटर, रिकॅबन, आर. आंदिले सिमेलने आणि लुथो सिपामला या खेळाडूंचा समावेश असणार आहे.
मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
8 नोव्हेंबर रोजी किंग्समीड डरबन येथे पहिल्या T20 सामन्याने मालिका सुरू होईल. यानंतर दुसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्क, तिसरा सामना 13 नोव्हेंबर रोजी सुपरस्पोर्ट पार्क, 15 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियम येथे खेळवला जाईल. सर्व सामने IST रात्री 9:30 वाजता सुरू होतील आणि स्पोर्ट्स-18 नेटवर्क आणि जिओ सिनेमा ॲपवर प्रसारित होतील.












Click it and Unblock the Notifications