Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Team India Squad: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; 'या' स्टार गोलंदाजाला डच्चू

Team India Squad vs New Zealand ODI Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. नवीन वर्षातील हा भारताचा पहिलाच दौरा असून या मालिकेतून स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

Team India Squad vs New Zealand ODI Series

शुभमन गिलकडे कर्णधारपद, श्रेयसची 'शर्ती'वर घरवापसी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकलेला शुभमन गिल आता पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. संघाचा उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. मात्र, श्रेयसच्या सहभागावर एक अट घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला आणि वैद्यकीय पथकाने त्याला 'फिट' घोषित केले, तरच तो मैदानात उतरू शकेल.

मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष; इशान-देवदत्तलाही स्थान नाही

या निवडीत सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे मोहम्मद शमी. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या शमीला या मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. शमीच्या जागी हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या युवा गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या इशान किशन आणि देवदत्त पडिक्कल यांनाही संघात स्थान मिळालेले नाही.

भारतीय संघ (ODI Squad for NZ Series)

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार*), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड: पूर्ण वेळापत्रक (२०२६)

भारतीय संघ या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेचे सामने वडोदरा, राजकोट आणि इंदूर येथे होणार आहेत.

एकदिवसीय मालिका (ODI Series)

११ जानेवारी: पहिला वनडे, वडोदरा

१४ जानेवारी: दुसरा वनडे, राजकोट

१८ जानेवारी: तिसरा वनडे, इंदूर

टी-२० मालिका (T20I Series)

२१ जानेवारी: पहिली टी-२०, नागपूर

२३ जानेवारी: दुसरी टी-२०, रायपूर

२५ जानेवारी: तिसरी टी-२०, गुवाहाटी

२८ जानेवारी: चौथी टी-२०, विशाखापट्टणम

३१ जानेवारी: पाचवी टी-२०, तिरुवनंतपुरम

हार्दिक पंड्या आणि बुमराह यांना का समाविष्ट केले नाही?

या संघ निवडीत हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की हार्दिक पंड्याला अद्याप बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) कडून एकदिवसीय सामन्यांमध्ये पूर्ण १० षटके टाकण्याची परवानगी मिळालेली नाही.

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक फेब्रुवारीमध्ये होणार असल्याने, बोर्ड हार्दिकच्या कामाच्या भाराबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. या रणनीतीचा एक भाग म्हणून, जसप्रीत बुमराहला देखील कामाच्या व्यवस्थापनामुळे विश्रांती देण्यात आली आहे, जेणेकरून तो विश्वचषकासाठी पूर्णपणे ताजेतवाने आणि तंदुरुस्त राहू शकेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+