Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जे रोहित- कोहलीला जमलं नाही ते शिवम दुबेनं करुन दाखवलं, असा विक्रम करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

Shivam Dube Creates History: इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली करुन मोठा विक्रम केला आहे. पाचव्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावांनी पराभव करून भारताने मोठा विक्रम रचला आहे. भारताकडून चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यात शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवम दुबेने इतिहास रचला

भारतीय अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने रविवार 2 फेब्रुवारी रोजी सलग 30 टी-20 सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू बनून इतिहास रचला आहे. शिवम दुबेने 3 नोव्हेंबर 2019 रोजी दिल्ली येथे बांगलादेशविरुद्ध भारताकडून टी-20 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 35 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला.

Shivam Dube

फोटो सौजन्य- पीटीआय

शिवम दुबेच्या नावावर एक अद्भुत विक्रम

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात महमुदुल्लाहच्या नेतृत्वाखालील बांगलादेशविरुद्ध भारताला 7 विकेटने पराभव पत्करावा लागला. याशिवाय तिरुअनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध भारताला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पण तेव्हापासून भारताने शिवम दुबेने भाग घेतलेला एकही टी-20 सामना गमावलेला नाही. ही कामगिरी करून शिवम दुबेने एक इतिहास रचला आहे.

शिवम दुबे सलग 30 सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला

जानेवारी 2020 मध्ये न्यूझीलंडला 5-0 ने मालिका जिंकणा-या टीम इंडियाचा दुबे भाग होता. त्यावेळी त्याने पाचही सामने खेळले होते. 2024 मध्ये 15 टी-20 सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दुबेचा समावेश करण्यात आला होता. टी-20 विश्वचषकात आठ सामने झाले आणि ते सर्व सामने टीम इंडियाने जिंकले.

इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी सुरुवातीला त्याची संघात निवड झाली नव्हती परंतु 25 जानेवारी रोजी नितीश कुमार रेड्डीच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दुबेने शेवटचे दोन सामने खेळले. 2 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात फलंदाजीने महत्त्वपूर्ण खेळी करून आणि अचूक गोलंदाजी करुन दोन विकेट घेत टीम इंडियाला दोन्ही सामने जिंकण्यास मदत केली.

जे रोहित- कोहलीला जमलं नाही ते शिवम दुबेनं करुन दाखवलं

शिवम दुबेने जे केले ते विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील करू शकले नाहीत. दुबेच्या आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत एक्स हँडलने सोमवारी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याला या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की "जर दुबे खेळला तर भारत जिंकतो. 30-0 आणि अजूनही मजबूत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+