इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा हेड कोच Gautam Gambhir सिद्धीविनायकाच्या दर्शनाला, पाहा- Video
Gautam Gambhir latest Marathi News : आयपीएल 2025 आता संपण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहेे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामने खेळले जातील. या मालिकेसह भारतीय संघ नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात करणार आहे. अशातच हेड कोच गौतम गंभीरची एक बातमी समोर आली आहे.

(Photo Credit : x.com/GautamGambhir)
गंभीर कुटुंबियांसह सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला
भारतीय संघाच्या इंग्लंड मालिकेपूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आपल्या कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला आहे. यावेळी कुटुंबियासह गौतम गंभीर यांनी पूजा केली.
गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाची कसोटी सामन्यांमध्ये कामगिरी काही खास राहिलेली नाही. 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला 1-3 असा पराभव पत्करावा लागला. याआधी, न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला क्लीन स्वीप केले आहे.
#WATCH | Head coach of Indian cricket team, Gautam Gambhir offers prayers at Shree Siddhivinayak Ganapati Temple in Mumbai.
— ANI (@ANI) May 15, 2025
(Video: Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust) pic.twitter.com/SHEcPyOJDs
निवडकर्त्यांसोबत महत्वाच्या मुद्द्यासाठी गौतम गंभीर सज्ज
गौतम गंभीर गुरुवारी बीसीसीआय निवडकर्त्यांसोबत एका महत्त्वाच्या बैठकीत भेटण्याची अपेक्षा आहे. कारण, ते इंग्लंड दौऱ्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य ठरवण्यासाठी भेटतील.
वृत्तानुसार, कसोटी सामन्यांमध्ये नवीन भारतीय कर्णधार आणि 5 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निश्चित करण्यासाठी गंभीर आणि निवडकर्त्यांची बैठक होणार आहे.
🙏 #ShreeSiddhivinayak pic.twitter.com/wa1ogQ8yy8
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 15, 2025
जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढले असल्याने सध्या या पदासाठी शुभमन गिल आणि ऋषभ पंत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
वृत्तांनुसार, गिल हा सर्वात जास्त पसंतीचा खेळाडू असल्याचे दिसून येत आहे. परदेशातील त्याच्या अपवादात्मक कामगिरीमुळे पंत उपकर्णधारपदी काम करेल अशी अपेक्षा आहे.
भारत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची सुरुवात हेडिंग्ले या ठिकाणी करणार आहे. कारण ही टीमसाठी नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलची सुरुवात देखील असणार आहे.












Click it and Unblock the Notifications