AFG vs IND टीम इंडिया-अफगाणिस्तान आमनेसामने, कोण जिंकणार?
मुंबई: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकातील महत्त्वाचा सामना आज रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक लवकरच होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ सुपर 8 मधील पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.

भारतीय संघाने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी करत सुपर 9 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर अफगाणिस्तानला ग्रुप स्टेजच्या टप्प्यातील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
अफगाणिस्तान आपली ताकद दाखवण्यासाठी आतुर
अफगाणिस्तान आपली ताकद दाखवण्यासाठी आतुर आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अफगाणिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने न्यूझीलंडला एकतर्फी पराभूत करून स्पर्धेतून बाहेर फेकले होते. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचे खेळाडू भारताविरुद्धही डाव पलटू शकतात.
खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात केन्सिंग्टन ओव्हलच्या खेळपट्टीवर होणार आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. पण यासोबतच फलंदाजांनाही येथे फटके मारणे सोपे जाईल. या खेळपट्टीवर चेंडू उसळल्यामुळे सहज बॅटवर येतो. याचा फायदा फलंदाजांना घेता होईल. येथे आतापर्यंत एकूण 47 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 30 सामन्यांमध्ये वेगवेगळ्या संघाने विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी 155 आणि दुसऱ्या डावाची सरासरी 146 अशी राहिली आहे.
येथे पाहू शकता लाइव्ह सामना
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T-20 विश्वचषक सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर हा सामना पाहता येईल. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाईल. मोबाइल वापरकर्ते सदस्यता न घेताही सामन्याचा आनंद घेऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications