T-20 World Cup: पाकिस्तानवर बाहेर पडण्याची टांगती तलवार, तर ऑस्ट्रेलियासाठी आज 'करो या मरो'
T20 World Cup 2026 Super 8 qualification : टी-20 विश्वचषक 2026चा थरार आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यामुळे 'सुपर-8' ची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकेकाळी विजेते राहिलेले पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सारखे बलाढ्य संघ आता स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

गट 'A' : पाकचे भवितव्य नामिबियाच्या हातात!
रविवारी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला ६१ धावांनी धूळ चारली. या विजयासह टीम इंडिया ६ गुणांसह 'Super 8' साठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. मात्र, पाकिस्तानसाठी आता मार्ग अत्यंत खडतर झाला आहे.
अमेरिकेचे आव्हान : अमेरिकेने नामिबियाचा ३१ धावांनी पराभव करून ४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.
पाकिस्तानचे गणित : पाकिस्तानचेही ४ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रनरेट अत्यंत खराब आहे. आता त्यांना त्यांचा शेवटचा सामना नामिबिया विरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. जर या सामन्यात नामिबियाने उलटफेर केला, तर 2009 चा विश्वविजेता पाकिस्तान गटातूनच बाहेर पडेल आणि अमेरिका पुढील फेरीत प्रवेश करेल.
गट 'ब': ऑस्ट्रेलियासमोर श्रीलंकेचे 'विराट' संकट
2021चा विजेता ऑस्ट्रेलिया सध्या गटात अडचणीत सापडला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे कांगारूंच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
आजचा निर्णायक सामना : आज संध्याकाळी 7 वाजता ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
इतर समीकरणे : श्रीलंकेलाही पात्रतेसाठी केवळ एका विजयाची गरज आहे. जर ऑस्ट्रेलिया आज हरला, तर त्यांना ओमानविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकून झिम्बाब्वेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. आयर्लंड आणि ओमान या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.
गट 'क': वेस्ट इंडिजची 'सुपर' एन्ट्री; इंग्लंडचा मार्ग खडतर
यजमान वेस्ट इंडिजने नेपाळचा 9 विकेट्स राखून धुव्वा उडवला आणि 'सुपर 8' मध्ये आपले स्थान पक्के केले. या निकालामुळे नेपाळचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
इंग्लंड विरुद्ध इटली : आज इंग्लंडचा सामना इटलीशी होणार आहे. इंग्लंडला पुढील फेरीत जाण्यासाठी विजय आवश्यक आहे. मात्र, इटलीने विजय मिळवल्यास स्कॉटलंड आणि इटली या दोन्ही संघांच्या आशा पल्लवित होतील आणि गतविजेत्या इंग्लंडला घरी परतवे लागू शकते.
गट 'ड': अफगाणिस्तानला चमत्काराची प्रतीक्षा
हा या स्पर्धेतील सर्वात कठीण गट ठरला आहे. दक्षिण आफ्रिका ६ गुणांसह पात्रतेच्या उंबरठ्यावर आहे.
न्यूझीलंडची स्थिती: किवी संघाने दोन विजय मिळवले असून कॅनडाविरुद्धचा पुढील सामना जिंकल्यास ते 'सुपर ८' मध्ये पोहोचतील.
अफगाणिस्तानचे भवितव्य : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांकडून पराभूत झाल्यामुळे अफगाणिस्तान आता दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून आहे. त्यांना त्यांचे उर्वरित सामने जिंकावे लागतील आणि न्यूझीलंडने कॅनडाकडून पराभूत व्हावे, अशी आशा करावी लागेल.












Click it and Unblock the Notifications