Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

T20 वर्ल्ड कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना मिळाली संधी

T20 World Cup 2025: आगामी अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निक्की प्रसादची T20 विश्वचषकासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत हा सध्या अंडर-19 महिला क्रिकेटचा चॅम्पियन संघ असून यावेळीही ते विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल. संघात अनेक बलाढ्य खेळाडूंचा समावेश आहे, जे विजेतेपदासाठी प्रयत्न करतील.

निकी प्रसादची कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी

टीम इंडियाने निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकला आहे. काही दिवसांपुर्वी क्वालालंपूर मलेशिया येथे पहिला अंडर-19 महिला आशिया चषक जिंकला आहे. विशेष म्हणजे 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत मलेशियामध्ये अंडर-19 महिला विश्वचषकही होणार असून भारतीय संघ या मैदानावरून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

India Under-19 Women Team

फोटो सौजन्य- पीटीआय

गेल्या वेळी विजेतेपद पटकावलं

शफाली वर्मा यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या अंडर-19 महिला विश्वचषकाचे विजेतेपदही भारताने जिंकले. भारतीय महिला क्रिकेट झपाट्याने पुढे जात आहे. यंदाही युवा खेळाडूंकडून विजेतेपदाची अपेक्षा असेल. चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. वैष्णवी एसचा टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे, तर नंदना एसला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.

भारताचा पहिला सामना कधी होणार?

सानिका चाळकेची उपकर्णधारपदी तर कमलिनी आणि भाविका अहिर यांची विकेटकिपर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत चार गट असणार आहेत. प्रत्येक गटात चार संघांचा समावेश असेल. भारताला अ गटात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांचा सामना यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्याशी होणार आहे. भारताचा पहिला सामना 19 जानेवारी रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालालंपूरच्या ब्यूमास ओव्हल स्टेडियमवर होणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघ

भारतीय संघ : निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकिपर), भाविका अहिर (विकेटकिप), ईश्वरी आवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, परिणीता सिसोदिया, केसरी दृष्टी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस

राखीव खेळाडू: नंदना एस, इरा जे, अनादी टी

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+