Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs CAN: आज भारत-कॅनडा सामन्यात सर्वाधिक धावा कोण करेल? हे असतील 3 प्रतिभावान खेळाडू

भारत आणि कॅनडा यांच्यातील टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामना आज फ्लोरिडामध्ये रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये धडक मारली आहे. तर कॅनडा सुपर 8 च्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे.

टीम इंडियाला कॅनडा विरुद्ध मात करुन विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला कॅनडा या मोहिमेचा शेवट विजयाने करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची फलंदाजी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. न्यूयॉर्कमध्ये तीन सामने खेळले गेले आहेत. तेथील खेळपट्टी फलंदाजीसाठी सर्वात कठीण होती.

t20 world cup 2024 india vs canada

तर यावेळी भारत-कॅनडा सामना फ्लोरिडामध्ये आज खेळला जाणार आहे. तिथली खेळपट्टी वेगळी आहे आणि टीम इंडियाने काही सामनेही खेळले आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेल्यानंतर टीम इंडियाचे काही सामने फ्लोरिडामध्ये आयोजित करण्यात आले आहेत. तिथेही धावा होतात आणि फलंदाजांना तेवढा त्रास सहन करावा लागत नाही.

या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली तर लक्ष मोठ्या धावसंख्येकडे असेल. या स्थितीत कोणत्या फलंदाजाची बॅट बोलते हेही पाहावे लागेल. असे काही खेळाडू आहेत जे मोठी धावसंख्या करण्याचा विचार करतील, यामध्ये हे तीन खेळाडू धमाका करू शकतात.

या यादीत पहिले नाव ऋषभ पंतचे आहे. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये ऋषभ पंतने आपल्या बॅटने धमाका करण्याचा प्रयत्न केला आहे. खराब खेळपट्टी असूनही पंत अस्वस्थ दिसत नव्हता. त्याच्याकडे प्रतिआक्रमण करण्याची क्षमता आहे, त्यामुळे पंत आजच्या सामन्यात सर्वाधिक धावा करू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट चमकली होती.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते पण उर्वरित दोन सामन्यात तो फ्लॉप ठरला. रोहित आज आपल्या फलंदाजीने आपली प्रतिभा दाखवू शकतो. तो टॉप स्कोअरर म्हणून उदयास येऊ शकतो. त्याच्या क्षमतेवर कोणालाच शंका घेण्याचं कारण नाही.

गेल्या सामन्यात आपल्या शानदार अर्धशतकाने भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचे ही नाव या यादीत येते. सूर्या आपला फॉर्म परत मिळवण्यात यशस्वी ठरला आहे आणि फ्लोरिडातील गोलंदाजांवर तो कहर करू शकतो. सूर्यकुमार यादव हा टी-२० मध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे, त्याच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+