काय सांगताय..? बाब्बोव..! 6 बाँलमध्ये 6 सिक्स अन् एक षटकात 39 धावा, युवराजचा विक्रम मोडला!
T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्वविक्रम मंगळवारी रचला गेला. T-20 विश्वचषक पात्रता फेरीतील सामोआ आणि वानुआतू यांच्यातील सामन्यादरम्यान हा विक्रम झाला.
सामोआचा फलंदाज डॅरियस व्हिसरने टी-20 विश्वचषक पात्रता सामन्यात वानुआतुचा गोलंदाज नलिन निपिकोच्या षटकात 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. या ओव्हरमध्ये 3 नो बॉलचाही समावेश होता. यासह T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील एका षटकात सर्वाधिक 39 धावांचा विक्रम रचला गेला.

भारताच्या युवराज सिंगचा विक्रम मोडला
आंतरराष्ट्रीय सामन्यांत यापूर्वी 36 धावांचा विक्रम होता. भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आणि निकोलस पूरन तसेच नेपाळचा दीपेंद्र अरी अशा चार फलंदाजांनी यापूर्वी एका षटकात 6 षटकारांसह 36 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. फलंदाज म्हणून एका षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी डेरियस व्हिसरने केली आहे. पण, 3 नो-बॉल्समुळे, टी-20 इंटरनॅशनलच्या एका षटकात ३९ या सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम बनला आहे.
सर्वात जास्त धावा देण्याचाही विक्रम
या सामन्यात आणखी एक विक्रम झाला. नलिन निपिको एका षटकात 36 किंवा त्याहून अधिक धावा देणारा सहावा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी स्टुअर्ट ब्रॉड (2007), अकिला धनंजय (2021), करीम जनात (2024), कामरान खान (2024) आणि अजमतुल्ला ओमरझाई (2024) यांनी षटकात 36 धावा दिल्या आहेत.
विसरच्या 62 चेंडूत 132 धावा
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा डॅरियस विसर हा सामोआचा पहिला खेळाडू ठरला. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. विसरने अवघ्या 62 चेंडूत 132 धावांची शानदार खेळी केली. या काळात त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 14 षटकार आले.
व्हिसरच्या खेळीच्या जोरावर समोआने 20 षटकांत 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात वानुआतु संघाला 9 विकेट्सवर केवळ 164 धावा करता आल्या. 6 षटकार मारणारा वेगवान गोलंदाज नलिन निपिको याने सर्वाधिक 73 धावांची खेळी खेळली.












Click it and Unblock the Notifications