Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सुर्यकुमार यादव - शिवम दुबेची स्फोटक खेळी, गोलंदाजांना धो-धो धुतलं

Syed Mushtaq Ali Trophy 2024 : टीम इंडियाचा संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये पिंक बॉलवर डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे .

सूर्यकुमार यादवने मुंबईविरुद्ध स्फोटक अर्धशतक झळकावलं आहे. फलंदाजीत मुंबईची सुरुवात काही खास नव्हती आणि अवघ्या 1 धावांच्या स्कोअरवर टीम इंडियाने पृथ्वी शॉच्या रूपाने पहिली विकेट गमावली. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या जोडीने आपल्या स्फोटक अंदाजात तुफान फटकेबाजी केली आहे.

Suryakumar Yadav

खराब सुरुवातीनंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी मुंबईची जबाबदारी स्वीकारली तेव्हा गोलंदाज चक्रावून गेले होते. मुंबईसाठी या सामन्यात सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत 76 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने 7 चौकार आणि 4 षटकारही लगावले आहेत. तर शिवम दुबे फलंदाजीत आणखीनच आक्रमक दिसत होता.

शिवम दुबेने या सामन्यात 36 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत शिवम दुबेने 7 षटकार आणि 2 उत्कृष्ट चौकारही लगावले. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या स्फोटक खेळीच्या बळावर मुंबई संघाने सर्व्हिसेसविरुद्धच्या निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात 4 गडी गमावून 193 धावा केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+