Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महेंद्र धोनीसारखीच आहे स्वप्निल कुसळेची स्टोरी! रेल्वेत 'टीसी' अन् आता 'हे' पहिल्यांदाच घडलं..वाचा

मुंबई - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच, भारतीय नेमबाजाने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत पदक जिंकले आहे. महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेने भारताला तिसरे पदक मिळवून देत ही कामगिरी साधली. विशेष म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये भारताची तिन्ही पदके नेमबाजीतच आली आहेत. विशेषतः स्वप्निल कुसळेची स्टोरी प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसारखी आहे.

धोनीप्रमाणेच स्वप्निल. टीसी

एम.एस धोनीप्रमाणेच कुसळे देखील तिकीट कलेक्टर (TC) आहे, धोनीही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रेल्वेत तिकीट कलेक्टर होता. स्वप्निलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे तिसरे पदक मिळवून दिले. स्वप्निल जेव्हा अंतिम फेरीत खेळण्यासाठी आला होता. तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा कुसळे हा पहिला भारतीय होता, त्याने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकले.

Paris Olympics 2024 PM Narendra Modi congratulated Swapnil Kusale

धोनीवरचा चित्रपट अनेकदा पाहिला

29 वर्षीय स्वप्निल कुसळे, महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या कांबळवाडी गावचा आहे, 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत आहे, परंतु त्याला ऑलिम्पिक पदार्पणासाठी 12 वर्षे वाट पाहावी लागली. धोनीला आदर्श मानणाऱ्या स्वप्निलने विश्वचषक विजेत्या क्रिकेट कर्णधाराच्या जीवनावर आधारित 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट अनेकदा पाहिला आहे.

धोनी का फेव्हरेट, स्वप्निलने सांगितले कारण

स्वप्निल कुसळे याने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी नेमबाजीमध्ये कोणत्याही विशिष्ट खेळाडूचे मार्गदर्शन घेत नाही. पण इतर खेळांमध्ये धोनी माझा आवडता आहे. माझ्या खेळात शांत राहण्याची गरज आहे आणि तोही मैदानावर नेहमी शांत असायचा. तो एकदा टीसी होता आणि मीही.

मध्य रेल्वेत नोकरी

कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. त्याचे वडील आणि भाऊ जिल्ह्याच्या शाळेत शिक्षक आहेत आणि आई गावची सरपंच आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले होते - आतापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मला शूटिंग आवडते आणि मला खूप आनंद आहे की मी इतके दिवस ते करू शकलो. मनू भाकर यांना पाहिल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आहे. ती जिंकू शकली तर आपणही जिंकू शकतो.

पंतप्रधान मोदींनी केलं स्वप्नीलचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वप्नील कुसळेच्या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले. पीएम मोदींनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे.

"पंतप्रधानांनी लिहिले- अप्रतिम कामगिरी! पॅरिस ऑलिम्पिक#ParisOlympics2024 मध्ये पुरुषांच्या 50m रायफल 3 पोझिशन्समध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे, कारण त्याने उत्कृष्ट चिवटपणा आणि कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे. अभिनव बिंद्रा यांनीही कुसळे यांचे अभिनंदन केले."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+