"ते माझ्या आईसारखेच! हात धरला अन् मला पुढे जाण्याची संधी" सुनिल गावस्करांनी सांगितली हृदयातील गोष्ट
Sunil Gavaskar called MCA like a mother : महान भारतीय क्रिकेटर आणि फलंदाज सुनील गावस्कर यांचा मुंबईतील शरद पवार क्रिकेट संग्रहालयाबाहेर पुतळा उभारण्यात आला. त्याचा अनावरण सोहळा पार पडला, या अनोख्या आणि भाऊक क्षणी स्वःत सुनील गावस्कर उपस्थित होते आणि त्यांनी जे भाष्य केले ते हृदयाला भिडणारे होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशन सुनील गावस्कर यांचा संग्रहालया बाहेर पुतळा उभारून एक भेट त्यांना दिली आहे. यावेळी आभारपर भाषणात सुनील गावस्कर यांनी भावनांनी ओतप्रेत भरलेले भाष्य केले आणि त्यांच्या जीवनात क्रिकेट आणि क्रिकेटचे सुरुवातीचा काळ किती महत्वाचा होता, हे सांगितले.

'मुंबई क्रिकेट असोसिएशन मला आईसारखे..'
सुनील गावस्कर म्हणाले की, "एमसीएन उभारलेल्या संग्रहालयाबाहेर माझ्या पुतळा उभारणे ही मोठी गोष्ट आहे, आपला पुतळा क्रिकेट संग्रहालयाबाहेर बसवला जाईल, जिथे दररोज हजारो लोक येतील अशी प्रत्येकाला संधी आणि सन्मान मिळतेच असे नाही. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन हे मला आईसारखे आहे कारण जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली सुरुवातीचा काय होता तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशन माझा हात धरला आणि मला पुढे जाण्याची संधी दिली."
"मी नेहमीच स्वतःला विद्यार्थी मानतो.."
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणाले, "मी नेहमी स्वतःला क्रिकेट इतिहासाचा विद्यार्थी मानले आहे. आमच्या काळात व्हिडिओ नव्हते, आम्ही पुस्तके, मासिके आणि आत्मचरित्रांमधून शिकलो. त्यामुळे हे संग्रहालय पाहून मला मनापासून आनंद झाला."
'येथे येणाऱ्या तरुणांना मिळेल प्रेरणा'
सुनील गावस्करने एमसीएला आईची उपमा दिल्यानंतर आणि मुंबई संघाचे आशीर्वाद असल्याचे म्हटल्यानंतर पुढे एमसीएने उभारलेल्या संग्रहालयाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, "केवळ मुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटसाठी अप्रतिम कार्य केले आहे. येथे येणाऱ्या तरुणांना इथल्या इतिहासातून आणि कथांमधून प्रेरणा मिळेल."
'मुंबईसाठी खेळणं हा मोठा आशीर्वाद'
सुनील गावस्कर यांनी मुंबईसाठी खेळणं हा आपल्यासाठी मोठा आशीर्वाद असल्याचा मानला आहे. "मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक दिवस हे सर्व..." असं म्हणत ते भावविभोर झाले होते. सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिला असा फलंदाज आहे ज्यांनी आपल्या फलंदाजीने देशाचे नाव जगात उंचावलं तसेच क्रिकेटमध्ये दहा हजार धावा काढल्या ते आजही नव क्रिकेट खेळाडूंसाठी आयडॉल आहेत प्रेरणास्थान आहे












Click it and Unblock the Notifications