Sri Lanka vs India : कोण आहे जेफ्री वँडरसे ? ज्याने 6 भारतीय दिग्गज फलंदाजांना बाद केले
Sri Lanka vs India, 2nd ODI, Jeffrey Vandersay : कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा संघर्ष करताना दिसली. श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करत 9 गडी गमावून 240 धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ 208 धावांवर ढेपाळला. श्रीलंकेने 32 धावांनी हा सामना जिंकला.
या सामन्यात भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला तो श्रीलंकेचा लेग स्पीनर जेफ्री वँडरसे. त्याने 7 षटकात भारताचे 6 दिग्गज खेळाडू बाद केले. या दमदार कामगिरीनंतर जेफ्री वँडरसे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे
कोण आहे जेफ्री वँडरसे
34 वर्षीय जेफ्री वँडरसेने 2015 मध्ये श्रीलंकेसाठी पदार्पण केले आणि त्याने एकदिवसीय सामने खेळले आहेत. जेफ्रीने 22 सामन्यांमध्ये भाग घेतला असून 5.54 च्या इकॉनॉमी रेटने 27 विकेट घेतल्या आहेत. एका सामन्यात चार विकेट घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय त्याने 47.63 च्या स्ट्राइक रेटने 111 धावा केल्या आहेत.

भारताविरुद्ध सहा विकेट्स
जेफ्री वँडरसेने भारताविरुद्ध सहा विकेट घेत सर्वांनाच चकित केले. जेफ्री वँडरसेचा चेंडू वाचण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि शिवम दुबे या दिग्गज खेळाडूंनी जेफ्री वँडरसेच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. या दमदार कामगिरीनंतर जेफ्री वँडर्से सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
वँडरसेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवून दिली
वँडरसेला आतापर्यंत कसोटी आणि टी-20 मध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची फारशी संधी मिळालेली नाही. तो फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे, ज्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 14 सामन्यांत केवळ सात विकेट्स घेतल्या आहेत. इतके मर्यादित सामने असूनही, त्याचा देशांतर्गत क्रिकेट विक्रम अधिक प्रभावी आहे. वँडरसेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरीच ताकद दाखवली आहे. त्याने 73 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 270 विकेट्स, 101 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 144 विकेट्स आणि 95 टी-20 सामन्यांमध्ये 94 विकेट घेतल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications