Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

SRH vs RR IPL Result : राजस्थानची हैदराबादपुढे शरणागती; ईशान किशनने 'या' खेळाडूला दिले शतकाचे श्रेय

आयपीएल- 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र त्यांचा हा निर्णय चुकला. सनरायझर्स हैदराबादचा बॅटिंग लाईनअप पाहता मोठी धावसंख्या होणार याचा अंदाज होता. झालंही तसंच. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशन नावाचं वादळ घोंगावलं. त्याने 47 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने 31 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 286 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा डाव गडगडला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 6 गडी गमवून 242 धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सचा या सामन्यात 44 धावांनी पराभव झाला. त्यामुळे नेट रनरेटवर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्चित आहे.

IPL 2025 Live Score

राजस्थानचा डाव गडगडला

विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग स्वस्तात बाद झाले. यशस्वी जयस्वाल फक्त 1 धाव, तर रियान पराग 4 धावा करून बाद झाले. नितीश राणाकडून अपेक्षा होत्या. मात्र तोही काही खास करू शकला नाही. त्याचा डाव 11 धावांवर आटोपला. त्यानंतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी डाव सावरला. संजू सॅमसनने 26 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यावेळी त्याने 6 चौकार आणि तीन षटकार मारले. संजू सॅमसननंतर ध्रुव जुरेलने अर्धशतकी खेळी केली. पण दोघं बाद झाल्यानंतर राजस्थानचा पराभव निश्चित झाला. संजू सॅमसन 66, तर ध्रुव जुरेल 70 धावा करून बाद झाला.

किशनने कमिन्सला दिले श्रेय

शतकानंतर किशन म्हणाला, "कर्णधाराने आपल्या सर्वांना खूप स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास दिला आहे. अभिषेक आणि हेडने सुरुवात केली तेव्हा त्यांनी डगआउटमध्ये बसलेल्या फलंदाजांना खूप आत्मविश्वास दिला. खेळपट्टी चांगली दिसत होती आणि आम्ही फक्त त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होतो." त्याने त्याच्या शतकाचे श्रेय कर्णधार पॅट कमिन्सला दिले. किशनने त्याच्या खेळीदरम्यान ११ चौकार आणि सहा षटकार मारले, ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत ६ बाद २८६ धावा करता आल्या. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वोच्च सांघिक स्कोअर होता.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+