सौरव गांगुलीच्या गाडीला दुर्गापूर एक्सप्रेसवेवर अपघात, दादा थोडक्यात बचावला
Sourav Ganguly News : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या गाडीला अपघात झाला. गुरुवारी संध्याकाळी उशिरा दुर्गापूर एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला आहे. ज्या वेळी हा अपघात झाला त्यावेळी सौरव गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कारने बर्दवानला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने दादा म्हणजेच सौरव गांगुली किंवा त्यांच्यासोबत ताफ्यात उपस्थित असलेल्या इतर कोणालाही दुखापत झाली नाही.
सुदैवाने, या अपघातात सौरव गांगुली किंवा त्यांच्या ताफ्यातील कोणीही जखमी झाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार दंतनपूरजवळ माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या ताफ्यासमोर अचानक एक ट्रॅक आला. समोरून येणाऱ्या ट्रॅकमुळे सौरव गांगुलीच्या ताफ्यातील वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागले. त्यावेळी ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली.

अचानक ब्रेक लावल्याने ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली. त्यापैकी एका कारची सौरव गांगुलीच्या कारशी टक्कर झाली. ही दुर्घटना घडली तेव्हा पाऊस पडत होता. दरम्यान दिलासा देणारी गोष्ट म्हणजे दादा म्हणजेच सौरव गांगुली किंवा त्यांच्यासोबत ताफ्यात उपस्थित असलेल्या इतर कोणालाही दुखापत झाली नाही.
वृत्तानुसार, सौरव गांगुलीच्या ताफ्यातील दोन वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर सौरव गांगुलीला सुमारे 10 मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली. यानंतर तो दुसऱ्या गाडीने कार्यक्रमासाठी निघून गेला. गांगुली बर्दवान विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. या अपघाताबाबत दादपूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत सौरव गांगुलीच्या गाडीचे कोणतेही नुकसान झाले नाही. या धडकेत ताफ्यातील दोन वाहनांचे नुकसान झालं आहे.












Click it and Unblock the Notifications