एकीकडे लग्नाची लगबग सुरू असतानाच स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; लग्न ढकलले!
Smriti Mandhana father heart attack : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्यासाठी रविवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार होता. स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा शाही विवाहसोहळा सांगली येथे पार पडणार होता.
मात्र, विवाहाच्या काही तास आधीच एक चिंताजनक बातमी समोर आली, ज्यामुळे हा सोहळा तात्काळ पुढे ढकलण्यात आला आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली, ज्यामुळे त्यांच्यावर सध्या सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमके काय घडले? प्रकृती कशी आहे?
श्रीनिवास मानधना यांना रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास छातीत कळ आली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान केले. उपचारादरम्यान, त्यांचा रक्तदाब देखील वाढलेला दिसून आला.
सध्या स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे मानधना कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
डॉक्टरांनी त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवले असून, त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील एक ते दोन दिवस त्यांना रुग्णालयातच देखरेखीखाली ठेवले जाईल.

डॉक्टरांनी काय सांगितले?
श्रीनिवास मानधना यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शारीरिक तणावामुळे त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर आहे. डॉ. नमन शाह यांनी सांगितले की, श्रीनिवास मानधना यांना यापूर्वी कोणताही गंभीर आजार नव्हता.
अँजिओग्राफीची शक्यता
उपचारांदरम्यान वाढलेला बीपी आणि सौम्य अटॅक लक्षात घेता, त्यांच्यावर आता अँजिओग्राफी (Angiography) करावी लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
स्मृती-पलाशचा विवाह पुढे ढकलला
या अनपेक्षित घटनेमुळे स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा रविवारी संध्याकाळी 4 वाजता होणारा विवाहसोहळा तात्काळ पुढे ढकलण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला.
लग्नाची पुढची नेमकी तारीख कोणती असेल, याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, श्रीनिवास मानधना पूर्णपणे बरे झाल्यावरच पुढील तयारी केली जाईल, असे कुटुंबीयांनी सांगितले.
स्मृती-पलाशची लव्हस्टोरी
स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल हे दोघे 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी सुरुवातीला आपले नाते खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांचे नाते अधिकृतपणे समोर आले. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये एका रोमँटिक क्षणी गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केले होते आणि तो क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या दोघांचा आणखी एक व्हिडीओ खूप चर्चेत आला होता, ज्यात ते सलमान खानच्या 'सलाम-ए-इश्क' चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'तेनू लेके मैं जावांगा...' यावर डान्स करताना दिसले होते. सध्या सर्व क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांकडून श्रीनिवास मानधना लवकर बरे व्हावेत आणि स्मृती-पलाशचा विवाहसोहळा लवकरच पार पडावा, यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
-
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण -
चांदीच्या दरात मोठी घसरण! इराण युद्धाच्या सावलीत किमती कोसळल्या; जाणून घ्या आजचे ताजे दर!







Click it and Unblock the Notifications